शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदारांच्या दहशतीने महिला डॉक्टरचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST

कोल्हापूर : एक माजी आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीमुळे सीपीआरमधील महिला डॉक्टरने थेट नोकरीचाच राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणच्या कारभाराची ...

कोल्हापूर : एक माजी आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीमुळे सीपीआरमधील महिला डॉक्टरने थेट नोकरीचाच राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणच्या कारभाराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे आरोग्य क्षेत्रात सीपीआर आणि राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उत्तम कामगिरी बजावत असताना, राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे सीपीआरची बदनामी होत असल्याची चर्चा आहे.

या महिला डॉक्टरांनी सप्टेंबरमध्येच राजीनामा दिला होता. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे तो स्वीकारण्यात आला नव्हता. या राजीनामा पत्रामध्ये या डॉक्टरांना थेट माजी आमदार आणि त्यांचाच कार्यकर्ता असलेल्या माजी उपमहापौर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. या माजी आमदाराचे व महिला डॉक्टरचे पती असलेल्या डॉक्टरचे अगोदरही विविध कारणांवरून वाद आहेत. त्यांच्या विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेत आला होता. गेल्याच महिन्यात माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांने त्यांच्या रुग्णालयाच्या दारात आंदोलन केले होते. तो राग सीपीआरमध्ये काढला जात असल्याची चर्चा आहे. सीपीआरमध्ये अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते पातळी सोडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी फोन करण्यापासून ते इशारे देण्यापर्यंत दहशत दाखवतात. सीपीआरच्या विविध विभागांच्यावतीने उल्लेखनीय काम सुरू असताना, अशा प्रकारांमुळे सीपीआर चर्चेत येत आहे.

चौकट

माजी उपमहापौरांची सीपीआरला भेट

महिला डॉक्टरांनी राजीनामा पत्रात ज्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, अशा माजी उपमहापौरांनी बुधवारी सीपीआरला भेट दिली. त्यांनी या ठिकाणी काही मागील प्रकारांची चौकशी केल्याचे समजते.