शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘वनीकरण तुमचं आणि मरण आमचं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : वाडवडिलांपासून कसत असलेल्या व प्रामुख्याने वहिवाट असणाऱ्या डोंगर रानात वनविभागाने प्रादेशिक वनीकरणाचे काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारुण :

वाडवडिलांपासून कसत असलेल्या व प्रामुख्याने वहिवाट असणाऱ्या डोंगर रानात वनविभागाने प्रादेशिक वनीकरणाचे काम सुरू केले असल्याने शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा येथील ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध केला आहे. ‘आधी आम्हाला या खड्ड्यांमध्ये गाढा व मगच सुरू असलेले हे बेकायदेशीर वनीकरण करा’ असा पावित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला.

वाडवडिलांपासून चालत आलेली व कूळ म्हणून कसत असलेली जमीन ही मूळ मालकाच्याच नावे राहिल्याने व मूळ मालक मृत पावल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या हाती कागदोपत्री कोणताच पुरावा? नाही. जिवंत असलेली हाडामासाची माणसं एवढाच काय तो पुरावा? ‘तुमची जमीन असल्याचा कागदोपत्री पुरावा? दाखवा’ या वन विभागाच्या प्रश्नाने जिवंत असलेल्या या माणसांचं अस्तित्वच नाकारण्याचा काहीसा प्रकार हा शित्तूर-वारुण या ठिकाणी राजरोसपणे घडतो आहे. रोजची वहिवाट असणाऱ्या डोंगररानात वनविभागाने वनीकरण केल्यास आमची गुरंढोरं चरणार कुठे? आणि दरवर्षी वनविभाग आपली हद्द अशीच वाढवत राहिला तर एक दिवस आम्ही बेघर होऊन मरण्यापेक्षा आताच आमच्यावर डोझर फिरवा व मोकळे व्हा! अशी उद्विग्न भावना येथील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रल्हाद राघवेंद्र देसाई या मूळ मालकाची या परिसरात जवळजवळ २२०० हेक्टर जमीन आहे. त्या जमिनीत या वाड्यावस्त्यांवरील १२५ कुळं आहेत. २२०० हेक्टरपैकी १९७५ च्या नोटिफिकेशननुसार ६०० हेक्टर जमीन ही वनविभागाला प्राप्त झाली असून, सध्या त्याच जमिनीत वनीकरणाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून या जमिनीत लागवडीचे काम सुरू असून, आतापर्यंत ४५ हजार रोपांचे वनीकरण या ठिकाणी झाले आहे. यावर्षी सुमारे ३२ हजार ५०० रोपांचे वनीकरण करण्याच्या तयारीत सध्या वनविभाग आहे.

मूळ मालकाच्या जमिनीसाठी वनविभागासह स्वतःला वारस म्हणवून घेणारे आणि या जमिनीचा खरेदी व्यवहार करणाऱ्यांमध्ये कोर्टात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दीडशे-दोनशे वर्षांपासून जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांचे यांच्यापैकी कोणालाच कसल्याही प्रकारचे सोयरसूतक नाही. कायदेशीर शहाणपणाच्या अभावामुळे डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या या शेतकरीवर्गाचा आतापर्यंत सगळ्यांनीच केवळ फायद्यासाठीच वापर केला आहे.

आतापर्यंत लोकसभा-विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहिला आहे. कित्येकदा या जमिनीसाठी आंदोलनेही झाली आहेत. प्रत्यक्षात मात्र या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळावा या दृष्टीने कधीच खरेखुरे प्रयत्न झालेले नाहीत आणि तशी तसदी घेण्याचे धाडस आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याआधी तरी कधी केलेले नाहीत. हा पेच सोडविण्यासाठी या प्रकरणात आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची व संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.

चौकट :

या २२०० हेक्टर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात केवळ बॉक्साईट मिळणार असल्यामुळे व यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्यामुळे या जमिनीसाठी प्रचंड मोठ्या चढाओढी सुरू आहेत.

नामदेव ढवळ ( ग्रामस्थ-ढवळेवाडी)

शासनाला दंड भरलेल्या जमिनीत सध्या वनीकरण्याचे काम सुरू आहे. आमच्या जमिनी या आता आमच्या नावावर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. यापुढे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर पद्धतीने हा लढा अधिक व्यापक करणार आहे.

नंदकुमार नलवडे (आरएफओ- शाहूवाडी) संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर ती जमीन नाही किंवा तशा स्वरूपाची कोणतीच कागदपत्रे त्यांच्याजवळ नाहीत. ती जमीन १९५३ पासून वनविभागाच्या नावावर असल्याने कायदेशीर मार्गाने त्या जमिनीवर सध्या प्रादेशिक वनीकरण्याचे काम सुरू आहे. शासकीय मोजणीनुसार ती जमीन जर खरोखर शेतकऱ्यांची असेल तर वनीकरणातील झाडांसह ती शेतकऱ्यांना परत देण्यात येईल.

फोटो:

प्रादेशिक वनीकरणाच्या कामास विरोध करताना त्या खड्ड्यांमध्ये बसलेले शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा येथील ग्रामस्थ. (छाया : सतीश नांगरे)