शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

फुटबॉलचा रणसंग्राम १९ पासून

By admin | Updated: November 9, 2016 01:37 IST

उत्सुकता वाढली : केएसए ‘ए’ डिव्हीजन लीगने होणार हंगामास प्रारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित के.एस.ए. लीग ‘ए’ डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा शनिवार (दि. १९ नोव्हेंबर) पासून शाहू स्टेडियमवर सुरू होणार आहे. के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धेपासूनच खऱ्या अर्थाने कोल्हापूर फुटबॉल हंगामास सुरुवात होत असल्याने फुटबॉल खेळाडू व फुटबॉलप्रेमी या लीगची आतुरतेने वाट पाहत असतात. गतवर्षातील पात्र व नोंदणीकृत एकूण १६ संघांची गतवर्षीच्या मानांकनानुसार पहिले आठ सीनिअर संघ सीनिअर सुपर ८ गटांकरिता पात्र ठरतील, तर बाकी आठ सीनिअर संघ सीनिअर ८ गटांसाठी पात्र ठरणार आहेत. यामधून सीनिअर सुपर ८ गटांमधील गुणानुक्रमे पहिले दोन संघ विजेता व उपविजेता ठरतील व सीनिअर ८ ग्रुपमधील गुणानुक्रमे शेवटचे दोन संघ के.एस.ए. ‘बी’ डिव्हिजनमध्ये याचवर्षी जातील. पोलिस प्रशासनाकडून आलेल्या सूचनास्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या फुटबॉल संघाचे नाव, खेळाडू व पदाधिकारी यांच्या नावांची यादी पोलिस ठाण्याकडे के.एस.ए.ने सादर केली आहे. प्रेक्षक गॅलरीत हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांवर लक्ष ठेवण्याकरिता मैदानावर, स्टेडियममध्ये व लगत बाहेरील बाजूस संपूर्ण सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचे रेकॉर्डिंग पोलिस ठाण्याकडे देण्यात येईल. तसेच फुटबॉल सामन्यापूर्वी, चालू असताना व संपल्यानंतर खेळाडू, समर्थक व प्रेक्षक यांच्यामध्ये गैरवर्तन झाल्यास त्या सामन्यात खेळणाऱ्या संघाच्या व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल. (प्रतिनिधी)असे आहेत नियम लीग सामन्यात एखादा संघ मैदानावर खेळण्यास न आल्यास त्या संघास पुढील सामन्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांचे संपूर्ण लीगमधील झालेले व पुढे होणारे सामने रद्द केले जातील व संघास व खेळाडूस वर्षभर पुढील कोणत्याही सीनिअर सामन्यात खेळण्यास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच संघास पुढीलवर्षी के. एस. ए. ‘बी’ डिव्हिजन लीगमध्ये खेळावे लागेल.स्पर्धेमध्ये दोन पिवळे कार्ड दाखविल्यास खेळाडूस लॉटस्प्रमाणे पुढील एक सामन्यात खेळता येणार नाही.एकाच सामन्यात खेळाडूस दोनवेळा पिवळे कार्ड झाल्यास परिणामी खेळाडूस लाल कार्ड दाखविण्यात येईल. यावेळी सदरच्या खेळाडूस तो खेळत असलेला सामना व लॉटस्प्रमाणे येणारा पुढील एक सामना खेळता येणार नाही. एखाद्या खेळाडूस डायरेक्ट रेड कार्ड दाखविण्यात आल्यास त्या खेळाडूस चालू सामना व पुढील एक सामना खेळता येणार नाही.यावर्षी सामना खेळण्यासाठी २० खेळाडूंची यादी घेण्यात येणार असून, यामध्ये ११ खेळाडूंना प्लेर्इंग इलेव्हन म्हणून, तर सात खेळाडूंना सबस्टिट्यूट व दोन खेळाडूंची नॉन-प्लेर्इंग म्हणून नोंद करण्याची आहे.