शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

दूध संकलन केंद्रांवर ‘अन्न-औषध’ची नजर

By admin | Updated: December 25, 2014 00:17 IST

पुढील आठवड्यापासून मोहीम : स्रोतापासूनच शुद्धिकरणाचा प्रयत्न

राजाराम लोंढे -कोल्हापूर --अन्नधान्याबरोबर दुधातील भेसळ ही शासनाची डोकेदुखी ठरत असल्याने भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिलेले आहेत. प्राथमिक दूध संस्था हाच दुधाचा मुख्य स्रोत असल्याने तेथूनच शुद्धिकरणाची मोहीम या विभागाने हाती घेतली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संकलन केंद्राची तपासणी सुरू केली जाणार आहे. दोषी आढळल्यास कमीत कमी दीड लाख रुपये दंड होऊ शकतो व भेसळीची तीव्रता पाहून फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. अलीकडील काळात दूध व्यवसायात नफेखोरी प्रवृत्ती वाढलेली आहे. जसजसे दुधाचे दर वाढत आहेत, तसतशी त्यामधील भेसळीचे प्रमाणही वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दुधात वेगवेगळी रसायने मिसळण्याचे प्रकार वाढले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अन्न-औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात विविध वीस दूध केंद्रांवर छापे टाकून नमुने ताब्यात घेतले. यामध्ये घेतलेल्या ४४ नमुन्यांमध्ये दोन संस्था असुरक्षित, तर अकरा दुय्यम दर्जाच्या निघाल्या. यामध्ये दुधात तेलाची भेसळ करणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील एका खासगी मिल्क प्रॉडक्टस कंपनीवर फौजदारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रक्रिया व विक्री केंद्राबरोबर संकलन केंद्रावर दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याने ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रे आता लक्ष्य करण्यात येणार आहेत. दुर्गम भागात अजूनही अस्वच्छ जागेत दुधाचे संकलन सुरू असते. दूध उत्पादकांमध्येही स्वच्छतेबाबत फारशी जागरूकता नाही.दुधात याची होते भेसळयुरिया, डिटर्जंट पावडर, स्टार्च पावडर, साखर,पाणी हवा, पाण्यानंतर दूधमाणसाच्या जीवनात हवा, पाण्यानंतर दूध ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुधाचा संबंध लहान मुलांशी येतो; पण त्याच्या सुरक्षिततेबाबत फारशी जागरूकता दाखविली जात नाही. त्यामुळे दुधाच्या शुद्धतेकडे शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातून गुटखा हद्दपार करण्याबरोबरच दुधातील भेसळ रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी विनापरवाना व्यवसाय सुरू आहेत. त्यासह भेसळीविरोधात मोहीम उघडली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनीही भेसळीबाबत आमच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. - सुकुमार चौगुले (सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन)