शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आजरा पाठोपाठ शाहूवाडी तालुक्यातही काळ्या भाताची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

अनिल पाटील सरूड : आजरा तालुक्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यातही काळ्या भाताच्या (तांदळाच्या) शेतीचा प्रयोग करण्यात येत आहे. शाहूवाडी तालुक्यातील ...

अनिल पाटील

सरूड : आजरा तालुक्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यातही काळ्या भाताच्या (तांदळाच्या) शेतीचा प्रयोग करण्यात येत आहे. शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे येथील प्रगतिशील शेतकरी गुरुनाथ शिंदे यांनी प्रथमच २० गुंठे क्षेत्रावर काळ्या भाताची पेरणी केली आहे. काळ्या भाताच्या लागवडीचा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

औषधी गुणधर्म तसेच खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या ‘चाकहो’ नावाच्या या वैशिष्ट्यपूर्ण काळ्या भाताची लागवड कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामधील शेतकऱ्यांबरोबरच शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे येथील गुरुनाथ शिंदे यांनीही केली आहे. काळा तांदूळ वैशिष्ट्यपूर्ण व औषधी असल्यामुळे बाजारात त्याला चांगली मागणी आहे.

यासाठी शिंदे यांनी माळरानावरील वीस गुंठे जमिनीची निवड करून त्यामध्ये आसामहून या भाताचे सात किलो बियाणे मागवून धूळवाफेतील पेरणी केलेली आहे.

या काळ्या भातामध्ये औषधी गुणधर्म असून हा काळा तांदूळ कार्डियो वेस्कूलर व कर्करोगावर उपायकारक असून, मधुमेही रुग्णांसाठी लाभदायी आहे. कोलेस्टेरॉलवर नियंत्रण, तसेच बद्धकोष्ठता व पचन संस्थेचे संबंधित तक्रारी दूर होणे, मेंदू व डोळ्यांसाठी उत्तम व लठ्ठपणासाठी उपयुक्त असा हा तांदूळ आहे. आणखी इतरही औषधी गुणधर्म या तांदळाचे आहेत.

कोट...

अनेक प्रयत्नांनी हे भात बियाणे मिळवले असून, सोनवडे गावामध्ये मी वीस गुंठ्यात याचा प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील वर्षी या शेतातील पिकलेल्या भाताची तपासणी करून ते बियाणे म्हणून या भाताची लागवड करू इच्छिणाऱ्या या भागातील सर्व शेतकऱ्यांना पुरवठा करणार आहे.

-गुरुनाथ शिंदे, प्रगतिशील शेतकरी, सोनवडे