शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीत उभारणार उड्डाणपूल

By admin | Updated: December 27, 2014 00:34 IST

अमल महाडिक : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पाठपुरावा

शिरोली : पुणे - बंगलोर महामार्गावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पादचारी उड्डाणपूल उभारण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला असून, उड्डाणपूल उभारणारच, असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. ‘लोकमत’ने शिरोली येथील ‘७९२ विद्यार्थी महामार्ग ओलांडतात रामभरोसे’ असे वृत्त आज, शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यावर आमदार महाडिक यांनी सांगितले, २००६ साली चौपदरीकरण पूर्ण होऊन वाहतुकीस हा रस्ता खुला झाला. महामार्गामुळे शिरोलीचे विभाजन झाले आहे. लोकसंख्या ४० हजारांवर असून, पैकी दहा हजारांहून अधिक नागरिक महामार्गाच्या पूर्व भागात यादववाडी, शिवाजीनगर, दत्तमंदिर परिसरात राहतात. ७९२ विद्यार्थी शाळेसाठी दररोज चारवेळा धोकादायकरीत्या महामार्ग ओलांडतात. या महामार्गावर वेगवान वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोकाही होऊ शकतो. तसेच शिरोलीच लोकांची वर्दळ असते. नागरिकांना रस्ता न ओलांडता जायचे असेल, तर शिरोली फाटा येथून जावे लागते. लांबचा रस्ता ओलांडून जाण्यापेक्षा नागरिक जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडतात. त्यामुळे पादचारी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले होते; पण रस्ते महामंडळाने दखल घेतली नव्हती. (प्रतिनिधी)शिरोली ग्रामपंचायतीकडून ठराव घेऊन पादचारी उड्डाणपुलाची मागणी रस्ते विकास महामंडळाकडे तसेच शासनाकडे केली आहे. याला तत्काळ मंजुरी घेऊन काम सुरू करणार आहे. - आमदार अमल महाडिक