शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर बाजार समितीवर एकीकरणचा झेंडा

By admin | Updated: January 15, 2017 01:08 IST

बेळगाव समितीत बरोबरी : निवडणुकीत मराठी भाषिकांचे वर्चस्व कायम

बेळगाव : बेळगाव आणि खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर मराठी भाषिकांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकरण समितीने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवत वर्चस्व राखले. बेळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सात मराठी भाषिकांनी विजय मिळविला. काकती आणि उचगाव मतदारसंघात मात्र काँग्रेसमधील मराठी भाषिकांनी विजय मिळविल्याने मागील तुलनेत एकीकरण समितीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शनिवारी खानापूर, बेळगावमध्ये झालेल्या मतमोजणीत कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती. सरदार हायस्कूलमध्ये मतमोजणी सकाळी नऊपासून सुरू होती. खानापूर येथील निवडणुकीत आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर एपीएमसीवर एकीकरण समितीचा झेंडा फडकला आहे. एकूण १३ पैकी १० जागा समितीने, तर भाजपने २ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली. खानापूरमधील दहा एकीकरण समितीच्या विजयी सदस्यांनी शिवस्मारकात विजयोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.बेळगाव तालुक्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन जागा कमी झाल्या. तालुक्यात मराठी भाषिक उमेदवारांची संख्या जास्त असली तरी एकूण १२ पैकी ५ जागांवर समितीला विजय मिळविता आला, तर ५ ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झालेत. दोन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. बेळगाव शहर मतदारसंघात एकीकरण समितीच्या तानाजी पाटील यांनी केवळ ८ मतांच्या अंतराच्या फरकाने विजय मिळविला. बेळगावातील एकूण ११ सदस्यांच्या निवडणुकीत एकीकरण समिती ५ , काँग्रेस ५, तर एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव निकाल व्यापारी संघ - महेश कुगजी (समिती)बेळगुंदी - निंगप्पा जाधव (समिती)बेळगाव - तानाजी पाटील (समिती)येळ्ळूर - महेश जुवेकर (समिती)उचगाव - युवराज कदम (काँग्रेस)काकती : आनंद पाटील (काँग्रेस)ब कुडची : सुधीर गड्डे (काँग्रेस )पिरनवाडी : आर. के. पाटील (समिती)सांबरा : फकिरा नाईक (भाजप)देसुर : संजू मदार (काँग्रेस)बागेवाडी : आक्काताई जत्ती (भाजप)हुदली : खान् गौडर (काँग्रेस)