शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक आघाड्यांचाच सरपंचपदावर झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST

कोल्हापूर : पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच ...

कोल्हापूर : पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच निवडणुकीतही स्थानिक आघाड्यांनीच पुन्हा एकदा आपणच गावचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी निवड झालेल्या १६७ पैकी ७३ ठिकाणी स्थानिक आघाडीचा सरपंच गावचा कारभारी झाला आहे. ४० सरपंचपदासह राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना १९ सरपंचपदासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजप १०, काँग्रेेस ९, महाविकास आघाडी ८, ताराराणी, जनसुराज्य प्रत्येकी ३, शेकाप, जनता दल प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल राहिले.

जिल्ह्यात स्थगिती आलेले सहा तालुके वगळून मंगळवारी कागल, राधानगरी, चंदगड, आजरा, हातकणंगले, गगनबावडा या तालुक्यातील १७३ गावांच्या सरपंच निवडी होणार होत्या, पण सरपंचपदासाठी आरक्षित उमेदवार नसल्याने ६ गावे वगळून उर्वरीत १६७ गावांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.

अपेक्षेप्रमाणे गगनबावड्यात पालकमंत्री सतेज पाटील एकहाती ८ पैकी ५ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या. कागलमध्येही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही ५३ पैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवले. हातकणंगलेत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले तर आमदार प्रकाश आवाडे व आमदार विनय काेरे यांनी देखील प्रत्येकी तीन गावे आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. आजऱ्यात पक्षापेक्षा २६ पैकी २६ ग्रामपंचायती गटांमध्येच विभागल्या गेल्या. राधानगरीतही ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीचा गड मजबूत केला. चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील गटासह ४० जागा स्थानिक आघाडीकडेच राहिल्या.

चौकट ०१

पक्षीय बलाबल

स्थानिक आघाडी : ७३

राष्ट्रवादी काँग्रेस : ४०

शिवसेना : १९

भाजप : १०

काँग्रेस : ०९

महाविकास आघाडी : ०८

ताराराणी : ०३

जनसुराज्य : ०३

शेकाप : ०१

जनता दल : ०१

(स्थानिक आघाड्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसचा सरपंच झाला असला तरी स्वबळावर काँग्रेसला गगनबावडा व राधानगरीत चांगले यश मिळाले आहे.

चौकट ०२

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वाधिक गावे आपल्याच पक्षाकडे दावा सर्वांनीच केला होता. भाजपनेही तसा दावा केला होता, पण प्रत्यक्षात सरपंच निवडी झाल्यानंतर भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यांना कागलमध्ये सर्वाधिक ७, गगनबावडा, १, चंदगड १ आणि हातकणंगले १ अशा १० गावांवरच समाधान मानावे लागले आहे.

चौकट ३

राधानगरी तालुक्यातील पनोरी या गावात सरपंच काँग्रेसचा आणि उपसरंपच भाजपचा असे झाले आहे. अशीच परिस्थिती आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे झाली. तेथे काँग्रेस, भाजप व शिवसेनेने एकत्र येत राष्ट्रवादीला बाजूला ठेवून पाच विरुद्ध चार अशी बाजी मारली.

चौकट ०४

राधानगरीतील बुरंबाळी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, पण तेथे सरपंच निवडीलाच बिनसल्याने वाद होऊन सर्व पक्ष बाजूला राहून सरपंच व उपसरंपच हे दोन्ही पदे एकट्या काँग्रेसकडे राहिली.

चौकट ०५

कागल : ५३ गावांपैकी ३१ गावात मुश्रीफ, संजय घाटगे गट ९, समरजित घाटगे गट ७

राधानगरी : १९ पैकी ९ ए.वाय.पाटील, कॉंग्रेस ४, आबीटकर १, शेकाप १, जनता दल १, स्थानिक आघाडी ३

चंदगड : ४१ पैकी ४० राष्ट्रवादी,शिवसेना, कॉंग्रेस यांची स्थानिक आघाडी, भाजप १

आजरा: २६ पैकी २६ स्थानिक आघाडी

हातकणंगले : २० पैकी महाविकास आघाडी ८, सर्वपक्षीय ३, शिवसेना ३, जनसुराज्य ३, ताराराणी आघाडी ३, भाजप ०१

गगनबावडा : ८ पैकी सतेज पाटील गट ५, भाजप १, स्थानिक आघाडी १, पी.जी. शिंदे गट १