शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

काेल्हापुरात तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST

कोल्हापूर : कोणताही सोहळा असला की त्यास नामवंत पाहुणेच पाहिजेत असाच सर्वसामान्य माणसाचा आग्रह असतो. त्यातही राजकारणी, धनाढ्य व्यक्ती ...

कोल्हापूर : कोणताही सोहळा असला की त्यास नामवंत पाहुणेच पाहिजेत असाच सर्वसामान्य माणसाचा आग्रह असतो. त्यातही राजकारणी, धनाढ्य व्यक्ती असली की त्याची चर्चाही होते अन‌् संयोजकांना मदतही मिळते. परंतु या विचाराला तसेच अपेक्षांना बगल देत कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगर परिसरात आधार फाउंडेशनतर्फे सोमवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण करुन एका दुर्लक्षित समुदायाचा सन्मान केला.

ढोल ताशा गजरात पाहुण्याचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले तृतीयपंथी, सामाजिक कार्यकर्त्या अंकिता आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी महापालिका अधिकारी उत्तमराव इनामदार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेवटी तृतीयपंथी राखी पाटील यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले.

फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गुदगे यांनी स्वागत केले. प्रशांत वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पट्टन, किरण कळीमनी, अजित यतनाळ, शिवाजी शेटे फाउंडेशनचे सदस्य राहुल कांबळे, अक्षय वाघमारे, उमेश सुतार, अक्षय तुदीगाल, यल्लाप्पा कोडलीकर, चंद्राप्पा खाने, चंद्रकांत तुदीगाल यांनी प्रयत्न केले.

फोटो क्रमांक - २७०१२०२१-कोल-आधार फौंडेशन

ओळ - कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगरातील आधार फाउंडेशनच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तृतीयपंथी, सामाजिक कार्यकर्त्या अंकिता आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.