शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींना पाच विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

महापालिका शाळांची स्थिती : यंदा १८७० विद्यार्थी वाढवण्याचे उद्दीष्ट

संतोष पाटील - कोल्हापूर -शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या झपाट्याने रोडावत आहे. ५९ पैकी मोजक्या चार ते पाच शाळा सोडल्यास चाळीसहून अधिक शाळांत विद्यार्थ्यांची संख्या तीन अंकीही नाही. त्यामुळे शाळेतील पटसंख्या वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक शिक्षकाने पहिलीसाठी किमान पाच विद्यार्थी आणावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ६ जूनपासून घरोघरी महापालिकेच्या शाळांचे मार्केटिंग केले जाणार आहे. त्यातून शिक्षण मंडळाने १८७० विद्यार्थीसंख्या वाढीचे उद्दिष्ट आखले आहे.महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय, असाच सर्वसामान्य जनतेचा ग्रह झाला आहे. त्याच मानसिकतेमुळे गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या चार वर्षांत अकराहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत. हा समज पुसून टाकण्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.खासगी शाळांचे जसे प्रस्थ वाढत गेले तसे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थीसंख्येला गळती लागली, ती आजतागायत सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांत २९४ विद्यार्थी कमी झाले. ५९ शाळांत फक्त ९५९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी गळती का झाली याचा शोध घेण्यापेक्षा ठोस कृती आराखडा तयार करून पटसंख्या वाढविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठी मंगळवारी महापालिका शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक शिक्षकाने किमान पाच नवीन विद्यार्थी आणावेत, अशी सूचना उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत ३७४ शिक्षकांकडून तब्बल १८७० विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.व्यक्तिमत्त्व विकासावर अधिक भर देण्याचा निर्धार करत विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी खास मार्गदर्शन वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्याची सर्व माहिती गुरुजी शहरातील घराघरांत जाऊन देणार आहेत. यासाठी शनिवार, ६ जूनपासून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढवायचीच, या निर्धाराने सर्व शिक्षक कामाला लागणार आहेत. महापालिकेच्या शाळा- ७५सुरू असलेल्या शाळा- ५९विद्यार्थ्यांची संख्या- ९५९७शिक्षक संख्या- ३७४प्रत्येकी पाचप्रमाणे १८७० विद्यार्थी संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट