शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जावरील पाच टक्के कपातीवरून संघर्ष पेटणार

By admin | Updated: June 26, 2015 00:15 IST

उपोषणाचा इशारा : टाकवडे येथे कर्जदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कुरूंदवाड : जिल्हा बॅँकेच्या पीक कर्जावर पाच टक्के कपात करण्याच्या निर्णयावरून टाकवडे (ता. शिरोळ) येथील शाखेत काही कर्जदार सभासदांनी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. ठेव कपात करूनच कर्जाची रक्कम दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २९) येथील शाखा कार्यालयासमोरच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठेव कपातीवरून जिल्ह्यात प्रथमच शेतकऱ्यांतून संघर्ष होणार आहे.शेतकऱ्यांना ऊस पिकावर सेवा संस्थेमार्फत जिल्हा बॅँकेकडून कर्ज मिळते. कर्जावर ठरावीक टक्केशेअर्स कपात करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याला देतात. मात्र, यंदापासून सेवा संस्थेबरोबरच जिल्हा बॅँकेतही पाच टक्के ठेव कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी चालू आहे. त्याशिवाय कर्जाची रक्कमच दिली जात नसल्याने आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी विरोध न करता रक्कम घेत आहे.गुरुवारी सकाळी येथील जिल्हा बॅँकेच्या शाखेतूनही कर्जातून ठेव कपात केली जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे, अनिल पाटील, राजू कलावंत, आदी शेतकऱ्यांनी कपातीला विरोध करीत शाखाधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. मात्र, बॅँकेच्या नियमानुसार कपात करून दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून संघर्षाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवेदन काढले असून, निवेदनावर विश्वास बालिघाटे, राजू कलावंत, आप्पासाहेब सूर्यवंशी, रघुनाथ बिरोजे, लक्ष्मण यादव, मनोहर कांबळे, आदींच्या सह्या आहेत.दरम्यान, बॅँकेच्या ठेव कपातीच्या निर्णयाला शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, या लाक्षणिक उपोषणाच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात प्रथमच संघर्षाची ठिणगी पडणार आहे. ( वार्ताहर )