शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या नगराध्यक्षांसह पाचजणांवर गुन्हा

By admin | Updated: February 22, 2017 00:26 IST

मतदारांना पैसे वाटप : राष्ट्रवादीच्या २१ कार्यकर्त्यांवरही गुन्हे

बागणी : बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातील रयत विकास आघाडीचे उमेदवार सागर खोत यांना मते देण्यासाठी शिगाव (ता. वाळवा) येथे सोमवारी रात्री मतदारांना पैशाचे वाटप केल्याप्रकरणी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्यासह पाचजणांवर अखेर आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला; पण त्यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी २१ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले.पैसे वाटपाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये निशिकांत भोसले-पाटील (इस्लामपूर), महेश पाटील, पांडुरंग पाटील, विजयकुमार पाटील, निवास पाटील (चौघे रा. शिगाव) यांचा समावेश आहे. याप्रकरणी मधुकर रंगराव पाटील (शिगाव) यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीच्या स्वरूपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, जितेंद्र पाटील अन्य १५ अनोळखींविरुद्ध शिगाव ग्रामपंचायतीजवळ जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सहाय्यक पोलिस फौजदार संजय सनदी यांनी फिर्याद दिली आहे. वहीतील पाने फाडली निशिकांत पाटील यांनी कोणाला किती पैसे वाटप केले, याची यादी वहीत तयार केली होती; पण पैसे वाटप सापडल्यानंतर त्यांनी वहीतील मतदारांच्या नावाची पाने फाडून टाकली. शेडचे मालक महेश पाटील यांनी मधुकर पाटील व त्यांचा पुतण्या रणजित यांना तेथून निघून जाण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असताना पैसे घेतलेले मतदारही तेथून निघून गेले. शिगाव (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पराभव समोर दिसू लागल्याने राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांकरवी षड्यंत्र रचून सर्वसामान्य मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच एका पोलिस अधिकाऱ्यालाही दमबाजी केली. दंगे भडकविण्यात जयंत पाटील किती माहीर आहेत, हे जिल्ह्याला माहीत आहे. -सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जनतेकडून वर्गणी गोळा करून निवडणूक लढवत होते. आता त्यांच्याकडे मंत्रीपद आल्याने, पैसा वाटून भ्रष्ट मार्गाने मते मिळविण्याचा उद्योग ते करत आहेत. एवढ्या कमी कालावधित मतदारांना वाटण्याइतपत पैसा कोठून आला,आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते. शिगाव (ता. वाळवा) येथील घटनेची सत्य वस्त्ुस्थिती माहीत असतानाही केवळ नगरपालिका निवडणुकीतील पराभव सहन न झाल्याने माझी प्रतिमा मलीन करण्याचा आमदार जयंत पाटील यांनी केलेला प्रयत्न निंदनीय आहे. त्यांनी कुटिल राजकारणाला पूर्णविराम द्यावा. अन्यथा त्यांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत उत्तर देऊ. -निशिकांत भोसले-पाटील, नगराध्यक्ष, इस्लामपूर.