शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करीप्रकरणी सराईत प्रदीप पाटीलसह पाच अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारू तस्करप्रकरणी गेले दोन वर्ष पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार प्रदीप ...

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारू तस्करप्रकरणी गेले दोन वर्ष पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार प्रदीप अर्जुन पाटील (रा. माटवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्यासह त्याच्या चार साथीदारांना अटक केली. पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका (ता. हातकणंगले) येथे बुधवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजीचे भरारी पथक व किणी टोलनाका स्टाफने सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईत सुमारे ३ लाख ८४ हजारांच्या रोकडसह आलिशान मोटार, नऊ तोळे सोन्याचे दागिने, विदेशी दारूचे दोन बॉक्स, मोबाइल असा एकूण १८ लाख ८४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेले संंशयित असे : मुख्य सूत्रधार प्रदीप पाटील याच्यासह प्रकाश अर्जुन पाटील (वय ४९, रा. मोटेवाडी, ता. सावंतवाडी), अजय सूर्यकांत कवठणकर (२३ रा. आटवण, ता. सावंतवाडी), रोहित दत्ता साळगावकर (२५), मंदार दत्ता साळगावकर (२९, दोघेही रा. कोणगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग).

गोवा बनावटीच्या दारू तस्करीप्रकरणी फरारी असलेला प्रदीप पाटील हा संशयित आरोपी कागल ते पुणे असा महामार्गावरून मोटारीतून प्रवास करत असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने किणी टोल नाका येथे सापळा रचून त्याला पकडले. त्याच्यासोबत चार साथीदारांनाही अटक केली. त्यांच्या मोटारीतून बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूचे दोन बॉक्स आढळले. त्यांच्या ताब्यातून ३ लाख ८४ हजार ६३० रुपये, आठ मोबाइल संच, त्यांच्या अंगावरील ९ तोळे सोन्याचे दागिने, मोटार असा मुद्देमाल जप्त केला. पाचही संशयितांना पुढील कारवाईसाठी मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या ताब्यात दिले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक तथा इचलकरंजीचे निरीक्षक पी. आर. पाटील, हातकणंगले भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, राजन साळोखे, आर. के. गुरव, अभिनंदन कांबळे, अतुल पाटील, प्रकाश पाटील, बी. एल. पाटील, रणजित यवलूजे, विलास पवार, सुभाष कोले आदींनी केली.

लाखाचे बक्षीस जाहीर

या धाडसी कारवाईबाबत भरारी पथकास राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबईचे आयुक्तांनी सुमारे एक लाखाचे बक्षीस जाहीर केले.

दोन वर्षे फरारी

अटक केलेला संशयित आरोपी प्रदीप पाटील हा गोवा बनावटीच्या दारू तस्करीप्रकरणी गेले दोन वर्षे आजरा, चंदगड पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई व सिंधुदुर्ग विभागाला गुंगारा देत होता. बुधवारी त्याला पकडले.

फोटो नं. १६०६२०२१-कोल-प्रदीप पाटील (आरोपी-एक्साईज)

फोटो नं. १६०६२०२१-कोल-प्रकाश पाटील (आरोपी-एक्साईज)

फोटो नं. १६०६२०२१-कोल-अजय कवठणकर (आरोपी-एक्साईज)

फोटो नं. १६०६२०२१-कोल-रोहित साळगावकर (आरोपी-एक्साईज)

फोटो नं. १६०६२०२१-कोल-मंदार साळगावकर (आरोपी-एक्साईज)

फोटो नं. १६०६२०२१-कोल-एक्साईज कोल्हापूर०१

ओळ : राज्य उत्पादन शुल्क विभाागच्या भरारी पथकाने किणी टोल नाका येथे पकडलेले गोवा बनावटीच्या दारू तस्करातील संशयित आरोपी.

===Photopath===

160621\16kol_8_16062021_5.jpg

===Caption===

फोटो नं. १६०६२०२१-कोल-प्रदीप पाटील (आरोपी-एक्साईज)फोटो नं. १६०६२०२१-कोल-प्रकाश पाटील (आरोपी-एक्साईज)फोटो नं. १६०६२०२१-कोल-अजय कवठणकर (आरोपी-एक्साईज)फोटो नं. १६०६२०२१-कोल-रोहीत साळगावकर (आरोपी-एक्साईज)फोटो नं. १६०६२०२१-कोल-मंदार साळगावकर (आरोपी-एक्साईज)फोटो नं. १६०६२०२१-कोल-एक्साईज कोल्हापूर०१ओळ : राज्य उत्पादन शुल्क विभाागच्या भरारी पथकाने किणी टोल नाका येथे पकडलेले गोवा बनावटीच्या दारु तस्करातील संशयीत आरोपी.