शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम तलावातील मासे हवामानातील बदलामुळे मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : हवामानातील अचानक बदल आणि गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने येथील राजाराम तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मासे ...

कोल्हापूर : हवामानातील अचानक बदल आणि गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने येथील राजाराम तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मासे मृत झाल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी काढला. राज्यभरातील अनेक तलावातील मासेही याच कारणाने मृत झाल्याचा अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे १५ मे नंतर सलग चार दिवस हवामानात बदल झाला. कडक उन्हाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, १५ मे ला येथील राजाराम तलावातील मासे मृत झाले. मृत माशांचा खच पडला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तलावातील पाण्याचे नमुने घेतले. तलाव कार्यक्षेत्रातून दूषित पाणी कोठून मिसळत आहे, का याची पाहणी केली. पण पथकाला दूषित पाणी मिसळले नसल्याचे दिसून आले. यामुळे हवामानातील बदल, पावसाचे गढूळ पाणी मिसळल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने तलावातील मासे मृत झाल्याचे मत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाचे आहे. प्राथमिक टप्यातच हा निष्कर्ष निघाल्याने त्यांनी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचे समोर आलेे आहे.

चौकट

नमुनेही लॉकडाऊन

पाण्याचे नमुने तपासण्याची प्रयोगशाळा चिपळूण येथे आहे. सध्या लाॅकडाऊन असल्याने येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनास तिथे नमुने पाठवण्यात व्यत्यय आला आहे. परिणामी राजाराम तलावातील पाण्याचे नमुने प्रशासनास पाठवता आले नाही. नमुनेही लॉकडाऊन झाले.

चौकट

राज्यातील इतर धरणातही मासे मृत

उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना कोळेगाव धरणातील मासेही अचानक मृत झाले. असाच प्रकार जायकवाडी धरणातही घडला. हवामानातील बदल आणि गढूळ पाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी सलग दोन, तीन दिवस मासे मृत होण्याचे प्रकार झाल्याचे म्हणणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहे.

कोट

राजाराम तलावातील पाण्यात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी मिसळल्याने आणि हवामानातील बदलामुळे ऑक्सिजन कमी झाल्याने तलावातील मासे मृत झाले असावेत.

प्रशांत गायकवाड,

उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ