शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मासे घेऊन चाललेला कंटेनर उलटला

By admin | Updated: November 25, 2014 00:29 IST

विद्यापीठ चौकात अपघात : ताबा सुटल्याने घटना

कोल्हापूर : रत्नागिरीहून मासे भरून बेळगावला चाललेला कंटेनर शिवाजी विद्यापीठ चौकात येताच चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून रस्त्याकडेला उलटला. कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पावलो फ्रान्सिस पिंटो (वय ३७, रा. शिरशी, जि. कारवार, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. मासे भरलेला कंटेनर उलटल्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही घटना आज, सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी, रत्नागिरीहून कोल्हापूरमार्गे बेळगावकडे कंटेनरआठ लाख किमतीचे मासे भरून निघाला होता. तो शिवाजी विद्यापीठ चौकात येताच चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून अचानक उलटला. चालक केबिनमध्ये अडकला होता. स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी धाव घेत केबिनमधून चालकाची सुखरूप सुटका केली. चालक भेदरून गेला होता. कंटेनरमध्ये मासे असल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरली. माशांनी भरलेला कंटेनर उलटल्याचे वृत्त शहरात पसरताच परिसरातील नागरिकांनी विद्यापीठ चौकाकडे धाव घेतली. राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत माहिती घेतली. कंटेनरमध्ये मासे असल्याने नागरिकांच्या गर्दीमुळे लूटमार होण्याची शक्यता ओळखून पोलीस कंटेनर सभोवती थांबून राहिले. आॅईल रस्त्यावर सांडल्याने रस्ता पूर्णत: निसरडा झाला होता. त्यामुळे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. (प्रतिनिधी)