शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जोंधळखिंडीत मुलींसाठी पहिली कुस्ती तालीम

By admin | Updated: February 22, 2017 23:21 IST

सहा महिन्यांपासून प्रशिक्षण : २५ मुलींचा सहभाग, जय हनुमान मंडळाच्या प्रयत्नांना मिळतेय यश

दिलीप मोहिते ल्ल विटालाल मातीत कुस्ती क्षेत्रात महिला मल्ल भरारी घेत असताना, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलींना कुस्तीतील मल्ल प्रशिक्षण देण्यासाठी खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी येथे सांगली जिल्ह्यातील पहिली कुस्ती तालीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झालेल्या मुलींसाठीच्या कुस्ती तालीममध्ये २० ते २५ मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. मुलींसाठी कुस्ती तालीम सुरू झाल्याने महिला मल्लांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.जोंधळखिंडी येथील श्री जय हनुमान तालीम मंडळाचे संजय अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तालीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अवघडे यांनी लाल मातीतील कुस्तीत महिला मल्लही उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. अजूनही त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर, या क्षेत्रात ग्रामीण भागातील मुली नेत्रदीपक यश मिळवू शकतात. त्यासाठी ही तालीम सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. या तालीममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कुस्तीची मला आवड आहे. त्यातच अमीर खानच्या ‘दंगल’मुळे आणखी प्रेरणा मिळाली. शालेय कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला. बऱ्याच ठिकाणी यशही मिळाले. कुस्तीतच मी करिअर करणार आहे. या खेळात आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे ध्येय ठेवले आहे आणि ते निश्चितच पूर्ण करेन.- प्रियांका दुबुले, प्रशिक्षणार्थी, वाळूज.जोंधळखिंडीसारख्या खेडेगावात महिला मल्लांसाठी लाल मातीतील तालीम सुरू झाली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. पुरुष मल्लांप्रमाणेच कुस्ती क्षेत्रात मुलीही नावलौकिक मिळवतील. अवघडे यांनी ग्रामीण भागात मुलींना मोफत कुस्ती प्रशिक्षण सुरू केले आहे. या तालमीत नामवंत महिला मल्ल तयार होण्यासाठी परराज्यातूनही सर्वतोपरी मदत केली जाईल.- उत्तमशेठ कदम, अध्यक्ष,केरळ स्टेट गोल्ड अ‍ॅन्ड सिल्व्हर रिफायनरी संघटना.