शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘राज्यातील पहिली औद्योगिक नगरी मिरजेत होणार’

By admin | Updated: February 12, 2015 00:57 IST

राज्यात पहिला मान : लवकर मार्गी लावण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही

कुपवाड : मिरजेत महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक नगरी (टाऊनशीप) अस्तित्वात येणार असून, हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी येथे दिली. मिरज एमआयडीसीमधील मुख्य आणि अंतर्गत अशा आठ कोटींच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रारंभ उद्योगमंत्री देसाई यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, उद्योग उभारणी प्रक्रियेत सुलभता यावी, हा चांगला व सकारात्मक दृष्टीकोन पुढे ठेवून आम्ही पुढे जात आहोत. लोकांना पूर्वी वाईट अनुभव आले आहेत. तसे आमच्याकडून होणार नाही. उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक वेळेवर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्योग विकासात लक्ष घातले आहे. सध्या उद्योग उभारताना ७६ प्रकारचे परवाने घ्यावे लागतात. ती संख्या कमी करून २५ वर आणणार आहे. यापूर्वी अडवणूक करण्यासाठी कायदे करण्यात आले. आम्ही त्यात सुलभता आणणार आहोत. आता विविध विभागांची परवानगी काढण्यात उद्योजकांना आयुष्य खर्च करावे लागणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. राज्यातील विविध एमआयडीसींमध्ये विनावापर पडून असलेल्या जागा काढून घेणार आहोत. त्याअंतर्गत तीनशेजणांना नोटिसा दिल्या आहेत. ते भूखंड काढून घेऊन नव्या उद्योजकांना देणार आहोत. त्यामुळेही उद्योग वाढतील. उद्योजकांचा एलबीटीला विरोध असून, आता जीएसटीची आकारणी होणार आहे. करदात्यांना विश्वासात घेऊन करआकारणी होणे गरजेचे आहे. महापालिकेने कररूपाने महसूल गोळा केल्यावर त्या वसाहतींना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्याठिकाणी मतदार नाहीत, म्हणून विकास न करणे चुकीचे आहे. आम्ही उद्योग खात्यातर्फे उद्योजकांना चांगले वातावरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकार स्थिर झाले असून, उद्योजकांनाही स्थिर करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. नगरसेवक गौतम पवार म्हणाले की, मिरज एमआयडीसीतील उद्योजकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागला. हा प्रश्न मिटल्याने या एमआयडीसीमध्ये उर्जितावस्था येईल. सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांनी स्वागत केले. के. एस. भंडारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष विकास सूर्यवंशी, आनंदराव पवार, बजरंग पाटील, विनोद पाटील, हेमंत पाटील, स्नेहलता गाडगीळ, हर्षल खरे, सागर पाटील, प्रकाश शहा, गणेश निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर) उद्योजकांसाठी आता ‘रेड कार्पेट’महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी आम्ही गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांसाठी रेड कार्पेट घालणार आहोत. त्यामुळेच उद्योग उभारणीची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. परिणामी राज्यात उद्योग निश्चितपणे वाढतील, असा विश्वास उद्योगमंत्री देसाई यांनी व्यक्त केला.