शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमोपचाराची टिश्श्यू टॅब्लेट, जिओथर्मल एनर्जी..

By admin | Updated: December 25, 2014 00:17 IST

विद्यापीठात आविष्कार महोत्सव : मध्यवर्ती संशोधन महोत्सव २ जानेवारीला

कोल्हापूर : प्रथमोपचाराची टिश्श्यू टॅब्लेट, जिओथर्मल एनर्जीचा वापर, घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या विविधांगी संशोधनाचे दर्शन आज, बुधवारी शिवाजी विद्यापीठात घडले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संशोधनविषयक आविष्कार महोत्सवात नवकल्पना मांडल्या.विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार २०१४-१५’ संशोधन प्रकल्प स्पर्धा रसायनशास्त्र विभागात झाली. यात सातारा कॉलेज आॅफ फार्मसीच्या मनोज मुळीक व श्रद्धा कुंभार यांनी ‘टिश्श्यू टॅब्लेट’चा प्रकल्प सादर केला. यात प्रवासादरम्यानच्या अपघातात एखादी जखम झाल्यास त्यावर तातडीने प्रथमोपचारासाठी हळद आणि टिश्श्यूपेपरपासून बनविलेली टॅब्लेट त्यांनी सादर केली. ही टॅब्लेट पाण्यात टाकल्यानंतर १५ सेकंदांत एखाद्या बँडेजपट्टीसारखी तयार होते. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील सतीश कुंभार याने ग्रीन हाउस, ग्लोबल वॉर्मिंग, घटता ओझोन रोखण्यासाठीचा प्रकल्प मांडला. त्यातून त्याने सध्याचे वास्तव दाखविले. साताऱ्यातील भाग्यश्री सुर्वे हिने ‘जिओथर्मल एनर्जी’चा विविधांगी वापर दाखविला. शोधनिबंधातून सांगलीतील शिराळा तालुक्याची बोली, मुला-मुलींमधील अंधश्रद्धेचा तुलनात्मक अभ्यास, मोडी लिपी, शिक्षणात होणारा सोशल नेटवर्किंगचा वापर, कोल्हापुरातील घटत्या लिंग गुणोत्तरातून वास्तव मांडले. संशोधनाचा ‘आविष्कार’ पाहण्यासाठी दिवसभर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती. मध्यवर्ती संशोधन महोत्सव २ जानेवारी २०१५ रोजी विद्यापीठात होणार आहे.विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. सावंत यांच्या हस्ते ‘आविष्कार संशोधन स्पर्धे’चे उद्घाटन झाले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे, डॉ. ए. एम. गुरव, आदी उपस्थित होते. डॉ. एम. ए. अनुसे यांनी स्वागत केले. डॉ. आर. एस. साळुंखे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)