शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार प्रथमोपचाराचे धडे

By admin | Updated: February 10, 2016 01:00 IST

आरोग्य विभागाचा उपक्रम : १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या जनजागृतीला प्रारंभ

गणेश शिंदे -- कोल्हापूर --दोन वर्षे यशस्वी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने (१०८ सेवा) कात टाकण्यास सुरुवात केली आहे. ही सेवा पुढील काळात माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयासह सरपंच, पोलीस पाटील आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) चालक व वाहकांना योग्य प्रथमोपचार प्रशिक्षणाचे धडे देणार आहे. याचा फायदा एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी होणार आहे. तिच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान याअंतर्गत ही १०८ ही टोल फ्री रुग्णसेवा राज्यात दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी असे चार जिल्हे येतात. या रुग्णवाहिकेमध्ये आठ अ‍ॅडव्हॉन्स्ड बाईक सपोर्ट व २८ मूलभूत प्रथमोपचार रुग्णसेवा आहेत. अ‍ॅडव्हान्स्ड बाईक सपोर्ट या सेवेमध्ये कार्डियाक मॉनिटर, व्हेंटिलेटर, इन्फ्युजन पंप, सिरीज पंप या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणा, तर ाूलभूत प्रथमोपचार रुग्णसेवेमध्ये औषधे, वेगवेगळी स्ट्रेचर व अन्य उपकरणे आहेत. कोल्हापुरात सीपीआर, कसबा बावडा (सेवा रुग्णालय), सावित्रीबाई फुले रुग्णालय, पुलाची शिरोली, उचगाव प्राथमिक केंद्र, कागल ग्रामीण रुग्णालय, आदी ठिकाणी ही १०८ रुग्णसेवा असते. रुग्णवाहिकेमध्ये दोन प्रशिक्षित चालक, प्रशिक्षणार्थी डॉक्टर तीन शिफ्टनुसार काम करतात.एखाद्या घटनेची अचूक माहिती, घटनास्थळाचा पत्ता, आदी माहिती समजावी व जखमींवर तत्काळ प्रथमोपचार करावेत यासाठी आता माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये यांच्यासह सरपंच, उपसरपंच तसेच राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यातील तरुण पिढीला याचा निश्चितच फायदा होईल, हा या पाठीमागील उद्देश आहे. सध्या जिल्'ात ३५ ते ४० हजार जणांमध्ये याबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्'ापाठोपाठ इतर तीनही जिल्ह्यात प्रथमोपचार प्रशिक्षण जनजागृती करण्याचा आपत्कालीन सेवेचा मानस आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या प्रत्येक गावा-गावांत योग्य रुग्णांवर प्रथमोपचार का व कसे करावेत, त्यांचे फायदे काय, या विषयी सर्व थरातून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी सरपंचांसह पोलीसपाटील यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. लवकरच याचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या आठ-दहा महिन्यांत प्रत्यक्षात प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देणार आहोत.- डॉ. संतोष मोरे, विभागीय प्रबंधक, १०८ सेवा, कोल्हापूर सर्कल. दृष्टिक्षेपात...जिल्हा१०८रुग्णवाहिका कोल्हापूर३६सांगली२४सिंधुदुर्ग१० रत्नागिरी१७लोकांना आवाहन...आपल्या तालुक्यातील नजीकच्या १०८ रुग्णवाहिकेची माहिती करून घ्या.आपत्कालीन परिस्थितीतच १०८ वर संपर्क साधा.कॉल केल्यावर प्रथम प्राथमिक माहिती अचूक सांगा. (उदा. आपले नाव, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, घटनास्थळाचे संकेतस्थळ, आदी.)घटनास्थळी पोहोचेपर्यंत आपला ाोबाईल व्यस्त ठेवू नये.घटनास्थळी पोहोचेपर्यंत आपणास प्रथमोपचार येत असल्यास चालू करावा.