शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

मुल्लाणी चिरमुरे दुकानास आग : साडेपाच लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:30 IST

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील मुल्लाणी फुडस माॅल या चिरमुरे, फुटाणे घाऊक विक्रेत्याच्या दुकानास शुक्रवारी मध्यरात्री शार्टसर्किटने आग लागली. ही आग ...

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील मुल्लाणी फुडस माॅल या चिरमुरे, फुटाणे घाऊक विक्रेत्याच्या दुकानास शुक्रवारी मध्यरात्री शार्टसर्किटने आग लागली. ही आग अग्निशमन दलाने चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास विझविली. या आगीत या दुकानाचे सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाले.

लक्ष्मीपुरीतील रिलायन्स माॅल शेजारी मन्सूर बापूसो मुल्लाणी (रा. जवाहरनगर) यांचे मुल्लाणी फुडस माॅल नावाचे चिरमुरे, फुटाणे व अन्य खाद्यपदार्थांचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी रात्री स्वत: मन्सूर व त्यांची मुले सोहेल व इरफान हे नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री पावणे बाराच्या सुमारास दुकानासमोर राहणाऱ्या नितीन कोगनोळे यांनी फुडसचे मालक मुल्लाणी यांना दुकानातून धूर येत असल्याची माहिती दिली. ते मुलांसह दुकानात आले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुनीता शेळके, पोलीस नाईक सुधीर हेगडे-पाटील व अन्य सहकारी गस्त घालत होते. तेही दाखल झाले. स्वत: मुल्लाणी व स्थानिक नागरिकांनी दुकानाचे शटर उघडले. यावेळी त्यांना इन्व्हर्टरला शार्टसर्किटने आग लागल्याचे दिसून आले. तळघरात प्लास्टिक पोत्यांमध्ये ठेवलेल्या चिरमुऱ्याच्या साठ्यास आग लागल्यामुळे खालूनही धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. शुक्रवारी दिवसभर दुकानातील नुकसान झालेला माल काढण्याचे काम सुरू होते.

फोटो : २६०२२०२१-कोल-मुल्लाणी

आेळी : कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील मुल्लाणी फुडस माॅलला लागलेल्या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले.