लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव:
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवीन प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला शासनाने मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासकीय मंडळात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे युवा कार्यकर्ते चेतन चव्हाण यांना सभापतीपदी वर्णी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे मंडळाची नियुक्ती थांबली होती. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय व्यक्तींचा प्रशासक मंडळात समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी अशासकीय प्रशासक मंडळ जाहीर केले होते. त्यानुसार आज आमदार राजू आवळे यांच्या उपस्थितीत पदभार सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्याकडून स्वीकारला.
यावेळी आमदार आवळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा. तसेच व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवून लोकाभिमुख पारदर्शक करण्याचा प्रयत्न नवीन प्रशासक मंडळाने करावा. यापुढे महाविकास आघाडी करून सर्वच निवडणुका लढवायच्या आहेत. बाजार समितीवरही निवडणुकीच्या माध्यमातून विजय संपादन करून सत्ता संपादन करायची आहे.
यावेळी चेतन चव्हाण, प्रा. बी. के.चव्हाण, ,रणजितसिंह यादव, फिरोज बागवान, एम. के. चव्हाण, शशिकांत पाटील,डी. बी. पिष्टे, सुहास माने, सात्तापा भवान आदींनी कोल्हापूर बाजार समितीचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांच्या बाजारभावाला दर मिळविण्यासाठी पाठपुरावा करूया असे आवाहन केले.
या प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक मंडळ (सभापती) चेतन संपतराव चव्हाण (सावर्डे), तर सदस्य म्हणून रणजितसिंह जयसिंगराव यादव (पेठवडगाव),उत्तम भीमराव पाटील(शिरोली), नानासों पक्कड गाठ (हुपरी), दशरथ बळवंत पिष्टे(कोरोची), गुंडा शंकर इरकर(हातकणंगले), फिरोज अजाज बागवान(पेठवडगाव),रावसो शाम चौगले(आळते),ॲड. महापती आत्माराम पाटील(रेंदाळ), श्रीधर बंडू पाटील (अतिग्रे), सूर्यकांत भाऊसो यादव (शिरोली), रमेश बापूसाहेब देसाई, प्रकाश रघुनाथ जाधव(पट्टणकोडोली), अनिल सर्जेराव जामदार (भादोले) यांचा समावेश आहे.
000000
चौकट १
निर्णयाविरोधात दाद मागणार- माजी सभापती पाटील
आम्ही अशासकीय मंडळ नेमणुकीच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. मात्रए शासनाने परस्पर यादी जाहीर करून मनमानी केली आहे. या विरोधात दाद मागणार आहेए अशी माहीती माजी सभापती सुरेश पाटील यांनी दिली आहे.
●फोटो ओळ:
पेठवडगाव : वडगाव बाजार समितीच्या अशासकीय संचालक मंडळातील सदस्यांचा सत्कार आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेतन चव्हाण, रणजितसिंह यादव, डी बीण पिष्टे, फिरोज बागवान, गुंडा इरकर, रावसो चौगले, सचिन चव्हाण, धोंडीराम पाटील,सूरज जामदार, कपिल पाटील आदी उपस्थित होते.