शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत डागडुजी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 17, 2014 00:19 IST

केशवराव भोसले नाट्यगृह सुशोभिकरण : खासबागच्या लॉनचे काम सुरू

कोल्हापूर : हेरिटेज वास्तू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची अंतर्गत डागडुजी, कॅटवॉक रॅम्प, मंडपी तसेच इमारतीच्या भिंतींच्या मजबुतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, तर खासबाग मैदानात लॉनची लागवड सुरू आहे. राज्य शासनाने दिलेल्या १० कोटींच्या निधीत केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. नाट्यगृहाची इमारत शाहूकालीन असल्याने गेले काही महिने फक्त नाट्यगृहाच्या भिंतींच्या मजबुतीकरणाचे काम सुरू होते. त्यासह इमारतीची गळती काढणे, जुन्या पत्र्यांच्या संवर्धनासाठी त्यावर अँटी पेंट करणे, नवीन कौले-पत्रे टाकणे, वास्तूला गिलावा करणे अशी अंतर्गत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सध्या कॉरिडॉर तसेच कॅटवॉक, मंडपी यांचीही कामे पूर्ण झाली असून बाल्कनीचे काम सध्या सुरू आहे तर साऊंड सिस्टीमसाठी येत्या काही दिवसांत टेंडर काढण्यात येणार आहे. खासबाग मैदान आणि नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम वर्षभरात संपवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार मैदानाचे काम वेळेत पूर्ण होईल. मात्र, नाट्यगृहाची इमारत हेरिटेजमध्ये असल्याने हे काम अत्यंत सावधगिरीने करावे लागत आहे. या कामासाठी वेळ लागत असला तरी आम्ही ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकारी अनुराधा वांडरे यांनी दिली.