शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: February 13, 2015 00:57 IST

‘दत्त-आसुर्ले’ उताऱ्यात, तर ‘जवाहर’ गाळपात आघाडीवर : जिल्ह्यात २० लाख टन, सांगली जिल्ह्यात १५ लाख टन ऊस शिल्लक

प्रकाश पाटील- कोपार्डे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर व सांगली) ३७ साखर कारखान्यांनी आजअखेर एक कोटी ३१ लाख ३६ हजार ६१८ मे. टन उसाचे गाळप करून १२.२१ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी ६० लाख ३८ हजार १०५ क्विंटल साखर तयार केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आले असून, अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात २० लाख टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख टन, असे ३५ लाख टन उसाचे क्षेत्र गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज आहे.साखरेचे दर घसरल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी एफआरपी एवढा दर देणेही कठीण होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ऊसदराचा रेटा लावून धरला, तर गाळप हंगाम लांबणार म्हणून एक पाऊल मागे येत संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेतील २७०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करा व कारखाने सुरू करा, असा अल्टीमेटम दिला. यातही थोडी सूट देत एफआरपीप्रमाणे दर द्या, असे जाहीर केले.यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या हंगाम सुरू होऊन जवळजवळ तीन महिने संपले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. आतापर्यंत या कारखान्यांनी १२.३४ या राज्यातील उच्चांकी उताऱ्यासह ८५ लाख ५७ हजार ९४१ मे. टन उसाचे गाळप करत एक कोटी पाच लाख ६२ हजार १० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया-आसुर्ले साखर कारखान्याने सरासरी साखर उताऱ्यात १२.८८ टक्के उतारा मिळवत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे, तर जवाहर कारखान्याने ८ लाख ७२ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करत गाळपात आघाडी घेतली आहे.सांगली जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, आजअखेर येथे ११.८९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ४८ लाख ४० हजार १५२ मे. टन उसाचे गाळप झाले आहे, तर ५७ लाख ५६ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील सर्वोदय रा. बा. पाटील साखर कारखान्याने १२.८१ सरासरी साखर उतारा मिळवून कोल्हापूर विभागात उताऱ्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही २० लाख मे. टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा हंगाम सर्वसाधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहील, असेही सांगण्यात येत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतजिल्ह्यातील दत्त-दालमिया वगळता इतर सर्वच कारखाने उसाचे बिलिंग करताना ढेपाळले आहेत. साखरेचे दर पडल्याने सर्वच कारखाने डिसेंबर अखेरपर्यंतच उसाचे पेमेंट करू शकले आहेत. यामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. दत्त-दालमिया साखर कारखान्याने दर १५ दिवसांचे उसाचे बिलिंग करण्याचा आपला वायदा पाळला आहे. गाळप (लाख मे. टन) प्रथम तीन कारखानेजवाहर, कोल्हापूर - ८,७२,९००वारणा, कोल्हापूर - ८,३५,५००दत्त-शिरोळ, कोल्हापूर - ७,०३,१०१.विभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्केविभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्के