शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्ल्स कंपनीच्या ठेवीदारांची गाळण

By admin | Updated: November 6, 2014 00:39 IST

कार्यालयात धाव : कर्मचारी आणि ठेवीदारांमध्ये जुंपली

कोल्हापूर : सहा वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवीत गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या पर्ल्स कंपनीच्या स्टेशन रोड येथील कार्यालयात गुंतवणूकदार व ठेवीदारांनी आज, बुधवारी धाव घेतली़ एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनंतर पर्ल्समधील आपले पैसे बुडणार, या भीतीने अनेक गुंतवणूकदारांनी आज सुटीच्या दिवशीही थेट कार्यालय गाठले़ पैसे परत दिल्याशिवाय जाणार नाही, असा पवित्रा गुंतवणूकदारांनी घेतल्यामुळे एजंट, सेवा केंद्राचे कर्मचारी आणि गुंतवणूकदार यांच्यात चांगलीच जुंपली़; पण कार्यालयास सुटी असल्याचे सांगून याबाबत उद्या, गुरुवारी सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन प्रसारमाध्यमे आणि गुंतवणूकदारांना दिल्यानंतर वातावरण निवळले़पर्ल्सने कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना सहा वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून देशभरातून सुमारे पाच कोटी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले होते़ जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांनी दामदुप्पट गुंतवणूक योजनेत पैसे गुंतविले आहेत़ मुदतीचा कालावधी संपल्यानंतर तीन महिने उलटूनही पैसे न मिळाल्यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त होते़ त्यातच वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनंतर गुंतवणूकदारांनी पर्ल्सच्या ग्राहक सेवा केंद्रात गर्दी केली़ बेळगाव, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यांतील गुंतवणूकदारांचा यात समावेश आहे़ यातील काहीजणांच्या गुंतवणुकीची मुदत पूर्ण व्हायला अद्याप अवघे काही महिने राहिले आहेत, तर काही जणांच्या गुंतवणुकीची मुदत संपून सहा महिने झाले तरी त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत़ केवळ एजंटाच्या आमिषाला बळी पडलोकेवळ एजंटाच्या बोलबच्चनगिरीला आणि जास्त व्याजदराला भाळून आम्ही पर्ल्समध्ये पैसे गुंतवले; पण आता पश्चात्ताप करायची वेळ झाली आहे़ आम्ही आपला पैसा जमिनीमध्ये गुंतवतो़ गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर कंपनी तुम्हाला भूखंड देणार आहे. गुंतवणुकीसाठी आम्हाला प्रवृत्त करणारे एजंटही आता ‘नॉट रिचेबल’ आहेत, अशी माहिती नरसगोंडा खोत, आशिष शहा, लक्ष्मी कांबळे या गुंतवणूकदारांनी दिली़गुंतवणूकदारांच्या पैशांतून जमिनी खरेदीचा सपाटापर्ल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ही कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते़ गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशांतून जमीन खरेदी करण्याचा सपाटाच या कंपनीने लावला आहे़ कंपनीविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी, २०१४ मध्ये ४५ हजार कोटींच्या फ सवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ कंपनी रजिस्ट्रारमधील माहितीनुसार गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या पैशातून पर्ल्सने देशभरात जमिनी १़८५ लाख हेक्टर जमीन खरेदी केली आहे़ गुंतवणूकदारांचा हा पैसा कंपनीने पंजाबमधील मोहाली, भटिंडा तसेच अन्य शहरांतील प्रकल्पांमध्ये तसेच जमीनखरेदीसाठी गुंतविला आहे़