शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

किमान वेतनासाठी दावे दाखल करणार

By admin | Updated: August 11, 2015 01:07 IST

ए. बी. पाटील : 'सायझिंग' कामगारांचा एकविसाव्या दिवशीही संप

इचलकरंजी : शहरातील सायझिंग कारखान्यांकडून किमान वेतनाच्या फरकाची रक्कम कामगारांना मिळावी, यासाठी सलग चार दिवस सहायक कामगार आयुक्तांकडे क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे दावे दाखल करण्यात येतील. हे दावे गतीने निकालात काढून कामगारांना त्यांच्या हक्काच्या वेतनाची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी कामगार नेते ए. बी. पाटील यांनी केली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांचा सोमवारी एकविसाव्या दिवशीही संप चालूच राहिला. येथील राजाराम स्टेडियममध्ये असलेल्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर आयोजित मोर्चावेळी पाटील बोलत होते. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना कामगार संघटनेचे एक शिष्टमंडळ भेटले.यावेळी कामगारांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सहायक कामगार आयुक्त गुरव म्हणाले, कामगारांकडून क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल केल्यानंतर संबंधित कारखानदारांना समन्स बजावली जाईल. दोन्ही बाजूंची सुनावणी झाली की, मग त्यावर निकाल दिले जातील. त्यानंतर ए. बी.पाटील यांनी शहर व परिसरातील १३० सायझिंग कारखान्यांवर तीन-चार दिवसांत टप्प्याटप्प्याने क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल होतील. ज्यामुळे किमान वेतनाच्या अंमलबजावणीचा विश्वास कामगारांमध्ये निर्माण होईल, असे सांगितले. यावेळी कामगार संघटनेचे आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दहा सायझिंगवर क्लेम अ‍ॅप्लिकेशनथोरात चौकातून निघालेला कामगारांचा मोर्चा आवळे मैदान, जनता चौक मार्गे राजाराम स्टेडियममध्ये आला. तेथे कामगारांना क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे नमुने वाटप करून कारखानानिहाय अर्ज एकत्रित केले. त्यातील जय महादबा (कोरोची), बालाजी सायझर्स दोन युनिट (गणेशनगर), लोटस पार्क तीन युनिट (कोरोची), जैनको (पार्वती इस्टेट), जठार टेक्स्टाईल (गणेशनगर), महालक्ष्मी (जयश्री) सायझर्स, गणेश (राजराजेश्वरीनगर) या दहा कारखान्यांवर क्लेम अ‍ॅप्लिकेशन सादर केल्याचे कामगार संघटनेने सांगितले.