शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पुनाळेकरांच्या विरोधातील तक्रार अर्ज न्यायालयात दाखल करणार

By admin | Updated: January 17, 2016 00:39 IST

पोलिसांची माहिती

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कॉ. दिलीप पवार यांनी दिली होती. त्यानुसार हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅड. पुनाळेकर यांचे पत्र व कॉ. पवार यांचा तक्रार अर्ज हा न्यायालयास सादर करणार असल्याची माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन दि. १५ जानेवारी रोजी कॉ. दिलीप पवार यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिले होते. त्यावर देशपांडे यांनी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी अदखलपात्र गुन्ह्याचा तपास होत नाही. अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांचे पत्र व तक्रारदार कॉ. पवार यांचा तक्रार अर्ज न्यायालयास सादर केला जाणार आहे. यावर न्यायालय पुढील निर्णय घेईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)