शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

राखीव बटालियनच्या दोन जवानात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST

कोल्हापूर : भारतीय राखीव बटालियनच्या दोन जवानांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. हाणामारीत मनोज संभाजी तळेकर (वय ३०, रा. साईनाथ कॉलनी, ...

कोल्हापूर : भारतीय राखीव बटालियनच्या दोन जवानांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. हाणामारीत मनोज संभाजी तळेकर (वय ३०, रा. साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) व भरत रामचंद्र पाटील (२९, रा. सांगवडे, ता. करवीर) हे दोन्हीही जवान गंभीर जखमी झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भारतीय राखीव बटालियन (आय.आर.बी.)चे येथील कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पिछाडीस जुन्या अधीक्षक कार्यालयात आहे. सोमवारी दुपारी मनोज तळेकर व भरत पाटील या दोघा जवानांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारीचा प्रकार घडला. भरत पाटील याने केलेल्या हल्ल्यात मनोज तळेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोळ्यानजीक गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना इतर सहकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर पाठोपाठ भरत पाटील हे जवानही उपचारासाठी दाखल झाले.

दोन्हीही जखमी जवानांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.