शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सडण्यापेक्षा रस्त्यावर लढून जगा

By admin | Updated: October 10, 2016 00:48 IST

बी. जी. कोळसे-पाटील : मारुतराव निकम यांचा गौरव

कोल्हापूर : लोकशाही असतानाही मूकपणे घरात सडत राहून मरण्यापेक्षा न्याय्य-हक्क मिळविण्यासाठी रस्त्यावर लढून जगा, असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी येथे केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) ज्येष्ठ नेते मारुतराव निकम यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे निकम गौरव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस नामदेवराव चव्हाण होते. यावेळी राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष नामदेवराव कांबळे, राजाराम साखर कारखान्याचे मानद संचालक पी. जी. मेढे प्रमुख उपस्थित होते. निकम यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांचा सपत्निक सत्कार माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. निकम यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात चव्हाण यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनाबाबत संघटना करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. यावेळी माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांच्यासह डॉ. अशोक चौसाळकर यांचे भाषण झाले. मारुतराव निकम म्हणाले, सर्वसामान्य कामगारांना स्वाभिमानाने जगणे शिकविल्याचे समाधान आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भक्कम संघटन केले. त्यातून किमान वेतन मिळविले. पेन्शनचा प्रश्न सुटेपर्यंत लढा दिला जाईल. निकम यांच्या पत्नी मनीषा यांचा सत्कार मीना चव्हाण यांनी केला, तर शब्दांकन करणाऱ्या अनिल चव्हाण, प्रियांका कांबळे यांचाही सत्कार झाला. सुशील लाड यांनी मानपत्र वाचन केले. कार्यक्रमास दत्ता मोरे, बी. एल. बरगे, सम्राट मोरे, वाय. एन. पाटील, शिवाजी पाटील, आनंद सोहनी, सुभाष लाड, रवी कांबळे, उपस्थित होते. नामदेवराव गावडे यांनी स्वागत केले. सतीशचंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. बबन पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)