शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरीत तरुणावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: August 22, 2016 00:44 IST

‘सावकाश जा’ म्हटल्याचे कारण

कोल्हापूर : तोल जाऊन अंगावर पडत असल्यामुळे सावकाश जा, असे म्हटल्याच्या कारणावरून जाब विचारत संग्राम मोहनराव घोडके (वय ३०, रा. शाहूपुरी ७ वी गल्ली) याच्यावर अज्ञात तरुणांनी रविवारी रात्री प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संग्राम घोडके गंभीर जखमी झाला असून, त्याला नातेवाईक व मित्रांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमी घोडके हा रविवारी रात्री शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील एका हॉटेलच्या दारातील पानपट्टीसमोर उभा होता. त्यावेळी हॉटेलमधून एक तरुण बाहेर आला. यावेळी तो तोल जाऊन घोडके याच्या अंगावर पडत होता. यामुळे घोडके याने त्याला शिस्तीत व सावकाश जा, असे म्हटले. या कारणावरून त्या तरुणाने घोडकेबरोबर वादावादी केली. तसेच त्याच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर त्याने घोडके याला अन्य एका साथीदाराकडे नेले. त्यातीलच एका साथीदाराने घोडकेवर फरशीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात घोडके ऐवजी त्यांच्यातीलच एका साथीदाराला ही फरशी लागली. त्यामुळे हा हल्ला घोडके यानेच केला, असा गैरसमज झाल्यामुळे अज्ञाताने आणखी साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तेथे येऊन घोडके याच्या पाठीवर व हातावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढविला. यामध्ये वार झाल्याने संग्राम रक्तबंबाळ झाला. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. ही घटना संग्रामच्या नातेवाईक व मित्रांना समजताच त्यांनी तेथे धाव घेत त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सीपीआर परिसरात नातेवाइकांनी गर्दी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांपैकी एकाला ओळखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी व सीपीआर रुग्णालयात येऊन जखमीकडे चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्णाची नोंद करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)