शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

थोडगे मारहाणीचा चौकशी अहवाल गायब

By admin | Updated: August 13, 2014 00:35 IST

अहवाल दिला : चौकशी अधिकारी गवळी : अद्याप मिळाला नाही; पोलीस अधीक्षक शर्मा अहवाल दिला : चौकशी अधिकारी गवळी : अद्याप मिळाला नाही; पोलीस अधीक्षक शर्मा

एकनाथ पाटील - कोल्हापूर -- गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे मारहाण प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब झाला आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवून दहा दिवस उलटले असले तरी आपल्यासमोर आतापर्यंत अहवाल प्राप्त झालेलाच नाही, असे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमका अहवाल गेला कुठे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. थोडगे हे १५ जुलैला नातेवाइकांच्या तक्रारीसंदर्भात करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात आले असता एका कॉन्स्टेबलने त्यांना अरेरावी केली. त्याबाबत त्यांनी जाब विचारला असता चार ते पाच कॉन्स्टेबलनी त्यांना बेदम मारहाण केली. आपल्याला विनाकारण मारहाण झाली म्हणून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय थोडगे यांनी घेतला. हा प्रकार समजताच आमदार चंद्रदीप नरके घटनास्थळी आले. त्यावेळी पोलिसांनी क्षमायाचना केली. त्यानंतर सामाजिक संस्थांनी हे प्रकरण लावून धरले. थोडगे यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यानुसार त्यांनी १६ जुलैला चौकशी अधिकारी म्हणून किसन गवळी यांची नियुक्ती केली. गवळी यांनी या संपूर्ण प्रकरणाची दहा दिवसांत गोपनीय चौकशी केली. त्यामध्ये ठाणे अंमलदार, मदतनीस, पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले अन्य कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, थोडगे यांचे जाब-जबाब घेतले. दरम्यान, सुमारे साठ पानी गोपनीय चौकशी अहवाल शनिवारी,  २ आॅगस्टला पोलीस अधीक्षकांच्या नावे आवक-जावक (टपाल) विभागाकडे सादर केल्याची माहिती चौकशी अधिकारी किसन गवळी यांनी दिली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा दोन दिवस प्रशासकीय कामकाजानिमित्त मुंबईला गेले. ते परत आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी थोडगे मारहाणीचा अहवाल आपल्याकडे आलाच नसल्याचे सांगितले.  याप्रकरणी त्यांच्याकडे तीनवेळा चौकशी केली असता त्यांनी तेच उत्तर दिले. प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले त्या अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीही आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगून हात वर केले. तपास अधिकारी गवळी मात्र आपण अहवाल सादर केल्याचे सांगत आहेत. त्यामुळे थोडगे अहवाल गेला कुठे? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न...आवक-जावक (टपाल) विभाग हा पोलीस मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्यावर पोलीस अधीक्षकांचा कक्ष आहे. दहा दिवस होऊनही येथून अहवाल पुढे सरकला की नाही याबाबत कोणी विचारणाही केलेली दिसत नाही. त्यामुळे टपाल विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणात करवीर पोलीस ठाण्यातील कर्मचारी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.