शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

साठ रुपये फी, लाखमोलाचा धीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

सादिक नगारसे। हलकर्णी तुम्हाला काय होतंय...किरकोळ आजार आहे... या गोळ्या घ्या, आराम करा, काळजी घ्या.. गरज पडली तर परत ...

सादिक नगारसे। हलकर्णी

तुम्हाला काय होतंय...किरकोळ आजार आहे... या गोळ्या घ्या, आराम करा, काळजी घ्या.. गरज पडली तर परत या.. हे आपुलकीचे शब्द आहेत हलकर्णीत सेवा करणाऱ्या खासगी डॉक्टरांचे. संपूर्ण तपासणी, काय होतंय याची आपसूक चौकशी, बी. पी., ऑक्सिजन तपासणी करून, काय नाही, आराम करा, बाहेर फिरू नका हा मौलिक सल्ला ६० रुपयांच्या माफक दरात तेही इंजेक्शन दिल्यास दिला जातोय. ना कोणती लुबाडणूक...ना कोणती संधी साधून पैसा कमावण्याची लालसा. निव्वळ सेवा देणे हे व्रत घेतलेले हलकर्णी परिसरातील खासगी डॉक्टर रुग्णासाठी देवदूत ठरत आहेत.

मे महिन्यात साधारण तीन ते साडेतीन हजार इतक्या सौम्य व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांवर येथील डॉक्टरांनी उपचार करून त्यांना बरे केले आहे.

गंभीर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय व अन्य तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांना बरे करण्यात आपले योगदान दिल्याने या डॉक्टरांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. वेळ पडल्यास आपल्याकडील उपलब्ध जागेत या रुग्णांना एका दिवसासाठी दाखल करून त्यांना बरे करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आपआपल्या रुग्णालयात सेवा देणारी ही १० डॉक्टरांची टीम भागासाठी वरदान ठरली आहे. हलकर्णीसह परिसरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. त्यातील काहीजण दगावले. अशा बिकट परिस्थितीत किरकोळ व अन्य आजाराने त्रासलेले रुग्ण शक्यतो उपचार घेण्यासाठी धजावत आहेत. अशा गोंधळलेल्या व भयभीत झालेल्या रुग्णांवर त्यांचा गैरसमज दूर करून त्यांच्यावर उपचार करून त्यांना आजार अंगावर न काढण्याच्या व कधीही फोन करून सल्ला येथील डॉक्टर देत आहेत.

* हे डॉक्टर आहेत सेवेत! सुभाष हत्तरकी, सुरेश हत्तरकी, अमृत धबाले, कृष्णकांत सावंत, किरण मराठे, श्रीधर चव्हाण, प्रवीण बालनाईक, श्रवण आरबोळे, गुंडूराव पाटील, मेघनाथ महाडिक.

-----

धोका आहे.. सुट्टी नाहीच.... वातावरणातील बदलामुळे अचानक सर्दी, खोकला, ताप यासह उलटी, जुलाब आदी रुग्णांत वाढ झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत यातील ३ डॉक्टरांनी कोरोनावर मात केली. तरीही सेवेत त्यांनी खंड पडू दिला नव्हता. यावेळीही मोठा धोका पत्करून हे देवदूत सेवा देत आहेत. हलकर्णी हे परिसरातील १० दवाखाने असलेले मोठे गाव आहे. त्यामुळे मे महिन्यातील रविवारची व कधी-कधी रोजच्या जेवणाची सुट्टी रद्द करून येथील डॉक्टर सेवा देत आहेत.

---------------------------