शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वीस नगरसेवकांचे भवितव्य ‘नगरविकास’कडे

By admin | Updated: May 3, 2016 00:45 IST

जात वैधता प्रमाणपत्राचे त्रांगडे : महापालिकेकडून विभागाला ५५ पानी वस्तुनिष्ठ अहवाल सादर

वीस नगरसेवकांचे भवितव्य ‘नगरविकास’कडेजात वैधता प्रमाणपत्राचे त्रांगडे : महापालिकेकडून विभागाला ५५ पानी वस्तुनिष्ठ अहवाल सादर कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नोव्हेंबर २०१५मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून विजयी झालेल्या २० नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचा सुमारे ५५ पानांचा वस्तुनिष्ठ अहवाल सोमवारी महानगरपालिका प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला. जातपडताळणी समितीकडे या संदर्भात आपल्याकडे कार्यवाही सुरू असल्याबाबतचे नगरससेवकांना दिलेल्या पत्रांच्याही प्रती या अहवालासोबत जोडल्या आहेत. मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता न आल्याने संबंधित २० नगरसेवकांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. या नगरसेवकांबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती महापालिकेने नगरविकास विभागाकडे केले आहे. त्यामुळे आता कारवाईचा चेंडू नगर विकास विभागाच्या कक्षेत गेला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांना पुढील सहा महिन्यांत म्हणजे ३० एप्रिल २०१६ पर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होेते. त्याबाबतचे हमीपत्र संबंधित नगरसेवकांनी निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जासोबत जोडले आहे. यापूर्वी ५ नगरसेवकांनी आपले जात वैधता प्रमाणापत्र समितीकडून घेऊन सादर केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून २८ नगरसेवकांच्या अर्जानुसार जातपडताळणी समितीकडून सुनावणी सुरूहोती. चार दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आठ नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले ते त्यांनी मुदतीत महापालिका प्रशासनाकडे सादर केले पण २० नगरसेवकांचा शनिवारपर्यंत अंतिम मुदतीपर्यंत अंतिम निर्णय न झाल्याने हे प्रमाणपत्र हाती मिळाले नसल्याने ते त्यांना सादर करता आले नाही. पण संबंधित नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांबाबत विभागीय जातपडताळणी समितीकडे कार्यवाही अद्याप सुरू असल्याचे पत्र समितीच्या उपायुक्त तथा सदस्य सचिव चव्हाण यांनी दिलेले हे पत्र सर्व नगरसेवकांनी महानगरपालिकेस सादर केले.२८ मार्च २०१६ रोजी शासनाने परिपत्रक काढून सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या नगरसेवकांबाबत अहवाल पाठवावा, असे निर्देश कोल्हापूर महानगरपालिकेस दिले होते. त्यानुसार शनिवारी हे जात वैधता प्रमाणापत्र सादर करण्याची अंतिम मुदत संपल्याने सोमवारी या २० नगरसेवकांनी मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नसल्याबाबतचा वस्तुनिष्ठ ५५ पानी अहवाल महापालिका प्रशासनाने राज्य नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवून कार्यवाही करण्याची विंंनंती केली. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले नगरसेवकमहापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम यांच्यासह सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, नीलेश देसाई, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसीना फरास, सचिन पाटील, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार, नियाज खान या नगरसेवकांचा जात प्रमाणपत्र सादर न केलेल्यांमध्ये समावेश आहे.कारभाऱ्यांची घालमेलसुमारे २० नगरसेवकांचे पद धोक्यात आल्याने या संबंधित नगरसेवकांसह सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांची घालमेल सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात दोनवेळा या कारभारी नेत्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन कारवाई न करण्याबाबत चर्चा केली.