शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

दौलत साखर कारखान्याचे भवितव्य अद्यापही अधांतरीच

By admin | Updated: November 22, 2015 00:33 IST

स्थानिक नेते आरोप-प्रत्यारोपात दंग : शेतकरी, कामगार, तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांच्याच आशेवर पाणी

नंदकुमार ढेरे ल्ल चंदगड यावर्षीही दौलत आज-उद्या सुरू होणार, अशा केवळ घोषणाच हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखान्याबाबत कानी येत आहेत. दौलत या हंगामात सुरू होईल याकडे चंदगड तालुक्यातील सभासद, शेतकरी व कामगार आस लावून बसला आहे. मात्र, गळीत हंगामास प्रारंभ होऊन, जिल्ह्यातील अन्य साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप दौलत सुरू होण्याबाबत काहीच हालचाली नसल्याने यावर्षीचाही हंगाम गेल्यात जमा आहे. मात्र, दौलतबाबत अद्यापही केवळ प्रयत्नच सुरू असल्याने दौलतचे भवितव्य सध्यातरी अंध:कारमय दिसत आहे. स्थानिक नेतेमंडळी दौलत चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. दौलत चालू करण्यासाठी तीव्र इच्छाशक्तीची गरज असून, सभासदांनीही पेटून उठण्याची गरज आहे. दौलत कारखान्यावर बेसुमार वाढलेल्या कर्जामुळे दौलत चालविण्यास घेण्यास कोणतीही पार्टी धजत नाही आहे. कर्जामुळे आज चौथ्या हंगामातही दौलत बंद आहे. दौलत कारखाना सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. दौलतबाबत केडीसीसीने ५०० हून अधिक वेळा चालवायला देण्याबाबत निविदा काढूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दौलतवरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस मोठा होत असल्याने चालवायला घ्यायला येणारे अनेकदा विचार करत आहेत. त्यात दौलत राजकारणाचा बळी ठरल्यामुळे येणारी पार्टी धजत नाही. तालुक्याच्या प्रमुख नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. जिल्हा बँकेच्या प्रयत्नांनाही अनेकदा यश न आल्याने चौथ्या हंगामातही दौलत बंद अवस्थेत आहे. एकेकाळी दौलत कारखान्यामध्ये नोकरी करणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. मात्र, दौलत म्हणजे खाबुगिरीचा अड्डा समजून तिच्यावर सत्ता भोगणाऱ्यांनी केवळ स्वत:चा विकास करून घेतला. दौलतकडे शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे, कामगारांचे थकीत पगार, परतीच्या बिनपरतीच्या ठेवी, शेअर्स रक्कम, आदी मोठ्या प्रमाणावर रकमा अडकल्या आहेत. दौलतची विक्री करून जवळपास साडेचारशे कोटींपेक्षा अधिक रक्कम आली तरच सर्वांची देणी मिळू शकतील. सन २०११ ला साखर जप्त केल्याने शेतकऱ्यांचे ३४ कोटी रुपये अद्याप न्यायालयात अडकले आहेत. दौलत कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. तो सुरू करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील प्रमुख तीनही नेते, शेतकरी, कामगार व सभासदांची कारखान्यावर बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सर्वाधिकार मुश्रीफ यांना देण्यात आले. मात्र, त्यांचेही अद्याप प्रयत्नच सुरू आहेत. स्थानिक नेते नरसिंगराव पाटील, गोपाळ पाटील व भरमूअण्णा पाटील एकत्र आले. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे दौलतचे घोंगडे अद्यापही भिजत आहे. दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीनेही दौलत चालवायला देण्याबाबत स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून उठाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांचा नेत्यांवरील विश्वास उडाल्यामुळे कोणीही स्वत:च्या खिशातील पैसे द्यायला तयार आहे. जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्यांनीच स्वत:च्या नावावर ठेवी ठेवून बँकेला ते तारण म्हणून देऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र याही प्रयत्नाला यश आले नाही. ‘दौलत’वर बराच काळ माजी आमदार नरसिंगराव पाटील यांची सत्ता होती. ते स्वत: नरसिंगराव पाटील चेअरमन असले तरी त्यांना आमदार व अन्य उच्च पदांची लॉटरी लागल्यामुळे त्यांचे कारखान्याकडे दुर्लक्ष झाले. कारखान्याचा वापर राजकीय अड्डा म्हणून केला. गावपातळीवरील निवडणुकांमध्ये कारखान्याचा पैसा वापरला गेला. गचाळ व्यवस्थापनामुळे कारखाना रसातळाला गेला.  

टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

४दौलत चालविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला हवे होते, त्यांनी पोटतिडकीने प्रयत्न केले नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पाचवेळा टेंडर झाली. कोणीही भरली नाहीत. हत्तीसारख्या फुगत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे यामध्ये टेंडरला प्रतिसाद मिळत नाही. दिवसेंदिवस कर्जाचा आकडा फुगत चालल्यामुळे टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ४दौलत सुरू होणार म्हणून चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकरी, कामगार, तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांच्याच आशेवर पाणी पडले असून, दौलत सुरू होणे या केवळ घोषणाच ठरल्या आहेत.