शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची अडवणूक

By admin | Updated: October 23, 2014 00:16 IST

सेवा सोसायट्यांची अनास्था : खते, बियाणे देण्यास टाळाटाळ

गगनबावडा : कृषी विभाग व शेतकरी यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या सोसायट्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा पुरवठा करण्याबाबत गावातील सहकार विकास सोसायट्यांनी अनुत्सुकता दर्शविली असल्याने शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे सेवा सोसायट्यांमार्फत स्थानिक पातळीवर देण्यात येत असल्यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यही टळत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सोसायट्यांनी खते, बी-बियाणे खरेदी करण्यास नकार दर्शविल्याचे कृषी विभागाकडून समजते. मुळात कृषी विस्तार व कृषी उत्पन्न वाढावे यासाठी या सोसायट्यांनी स्थानिक पातळीवर कृषी विभाजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साधनसामग्री पुरविणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश सर्व सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देऊन बाकीची जबाबदारी झटकताना दिसतात. कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरी व कृषी विभाग यांच्यात गावातील विकास सोसायटी हा केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला ग्राम स्थरावर सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना साधनसामग्री, कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. किंबहुना सोसायटी ही शेतकऱ्यांना महत्त्वाचा दुवा ठरणारी अशी संस्था आहे. विकास सोसायटीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असतानाही तालुक्यातील सोसायटी चालकांच्या अनास्थेपायी शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदी करण्यासाठी तालुकास्तरावर पायपीट करावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये सोसायट्यांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.