शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘कृषी संजीवनी’ला शेतकऱ्यांचा थंडा प्रतिसाद

By admin | Updated: November 26, 2014 00:06 IST

जागृती करण्यात अपयश : थकबाकीदार ३४ लाख शेतकरी, पाच लाख शेतकऱ्यांनीच घेतला लाभ

प्रकाश पाटील - कोपार्डे --वीज थकबाकीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आघाडी शासनाने सुरू केलेल्या ‘कृषी संजीवनी’ योजनेला शेतकऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिल्याचे चित्र असून, थकबाकीदार असलेल्या राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या पाच लाख शेतकऱ्यांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात एकतर शासनाला अपयश आले आहे.राज्यातील शेतकऱ्यांकडे शेती वीजपंपांच्या असणाऱ्या थकबाकीकडे महावितरणने विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच कोळसा आणि गॅस टंचाईमुळे वीजनिर्मिती हा कळीचा मुद्दा बनला आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी कमी दराने वीज यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिल थकबाकीवर ‘कृषी संजीवनी’ योजना सुरू केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मूळ थकबाकीच्या निम्मी रक्कम भरल्यास उर्वरित निम्मी रक्कम आणि त्यावरील व्याज आणि दंड माफ करण्यात येते.३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली; मात्र अवघ्या पाच लाख १५ हजार शेतकऱ्यांनीच या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे थकबाकीपोटी महावितरणच्या तिजोरीत अवघे ४६० कोटी रुपये जमा झाले आहेत. अद्याप ३३ लाख ८५ हजार शेतकरी थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मोफत, कधी निम्म्या किमतीत, तर कधी २४ तास वीज पुरविण्याच्या आकर्षक घोषणा भाजपने दिल्या होत्या. दरवर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेची भुरळ पडल्याने त्यांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेला भरभरून यश दिले आहे. आता भाजप सरकार सत्तेवर आले असून, मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, चुकीच्या वाढीव बिलांमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. गळती कमी दाखविण्यासाठी एकूण वापरापैकी २५ टक्के वीज वापर हा कृषिपंपांना दाखविला आहे. तसेच मीटर असूनही अवाजवी रीडिंग घेऊन, तर मीटर नसलेल्या वीजपंपांना अश्वशक्ती क्षमता वाढवून बिले दिली असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचेही चित्र आहे.परिमंडलनिहाय जमा थकबाकी (कोटी रुपयांत)पुणे : १८.८५अकोला : १६.८३औरंगाबाद : १०.९६बारामती : ८६.१०भांडूप : ३जळगाव : १०८.७०कल्याण : १.६कोकण : १२कोल्हापूर : ३५.९८लातूर : ३५.४०नांदेड : ७.७०नाशिक : ११९.५८नागपूर (शहर) : ६.३०नागपूर (ग्रामीण) : १२.४१