शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

शेतकरी संघ, मजूर संघाचे उद्यापासून धूमशान

By admin | Updated: August 23, 2015 17:53 IST

जिल्ह्याचे लक्ष: शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ व कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे धूमशान सोमवारपासून (दि.२४) सुरू होत आहे. शेतकरी संघासाठी शुक्रवारी (दि. २८) तर मजूर संघासाठी शनिवारी (दि. २९)पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून १४ सप्टेंबरपर्यंत माघार घेता येणार आहे. शेतकरी संघासाठी २५ सप्टेंबर तर मजूर संघासाठी २३ सप्टेंबरला मतदान होणार आहे. शेतकरी संघाचे व्यक्ती सभासदांबरोबर विकास सेवा संस्था, दूध संस्था, प्रक्रिया संस्था, कुक्कटपालन, पाणीपुरवठा संस्था सभासद आहेत. गेली तीन महिने संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींची नावे घेऊन सहकार विभागाने मतदार यादी तयार केली आहे. प्रारूप यादीवर ३१ जुलैपर्यंत हरकती घेऊन १२ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम यादी प्रसिद्धीनंतर दहा दिवसांत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, लागतो. त्याप्रमाणे सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून २९ आॅगस्टला दाखल अर्जांची छाननी होणार आहे. ३१ आॅगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून १४ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. अर्ज लक्ष्मीपुरी येथील करवीर सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल केले जाणार आहेत. शेतकरी संघाच्या गत निवडणुकीत बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल यासह सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केले होते. त्यामध्ये बऱ्यापैकी यश आले होते. यावेळीही सत्तारूढ गटाचे नेते व संघाचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव मोहिते व कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी करवीरचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे काम पाहत आहेत. कोल्हापूर मजूर संघासाठीही सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या संघासाठी संस्था सभासद असून मतदान मोजकेच असल्याने प्रत्येक निवडणुकीत अटीतटीचा सामना होतो. गेल्यावेळेला मुकुंद पोवार व उदय जोशी यांच्यात सरळ लढत झाली होती. मध्यंतरी पोवार यांच्या अविश्वास ठराव आणून उदय जोशी यांनी कब्जा मिळविला. मतदारयादी करताना काही संस्थांना अपात्र केल्याने निवडणुकीत टोकाचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे ठाकरे काम पाहत आहेत.