शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

(दीपक मेटील) सडोली (खालसा) : कांडगाव, शेळकेवाडी, वाशी येथील कृषिपंपांना गेली दोन महिने कमी दाबाने वीजपुरवठा ...

(दीपक मेटील)

सडोली (खालसा) : कांडगाव, शेळकेवाडी, वाशी येथील कृषिपंपांना गेली दोन महिने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कोथळी व कांडगाव महावितरणकडे तक्रार देऊनही याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असून ऐन उन्हाळ्यात पाणी उशाला असून पिके मात्र करपली जात आहेत. येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

भोगावती नदीवरील कांडगाव, वाशी, शेळकेवाडी या गावांतील कृषिपंपांना वाशी फिल्डअंतर्गत सहकारी संस्था व खासगी कृषिपंपधारकांना कोथळी महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून दिवसपाळीत या कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा सुरू असल्याने काही शेतकऱ्यांचे कृषिपंप जळाले आहेत. वारंवार हे सुरू असून, कृषिपंपांना आठ तासाऐवजी पाच तासच विद्युत पुरवठा होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषिपंपही मोकळेच फिरून जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वीजबिलात वाढ होत असल्याने यांचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. गेली दोन महिने हा प्रकार सुरू असून कोथळी (ता. करवीर) येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रार देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कृषिपंपधारकांनी केला आहे.

प्रतिक्रिया

कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून यामुळे माझा कृषिपंप जळाला आहे. वारंवार महावितरण कार्यालयात तक्रार देऊनसुद्धा याकडे महावितरण दुर्लक्ष का करत आहे. या प्रकारामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’, अशी या परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. तत्काळ उच्चक्षमतेने विद्युत पुरवठा करावा अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.

जयदीप शेळके

शेळकेवाडी शेतकरी

प्रतिक्रिया 2

या परिसरात सहकारी संस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे असून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या जिवावरच अनेक शेतकरी अवलंबून असून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वारंवार वीज खंडित होत आहे. केवळ चार तासच वीजपुरवठा होत असल्याने पिके वाळू लागली आहेत, तर कृषिपंप जळण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

रणजित पाटील

सचिव महालक्ष्मी सह. पाणीपुरवठा कळंबा, ता. करवीर.