शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गवताचा भारा मानेवर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

मुरगूड : डोंगर पठारावरून वैरण आणताना भारा मानेवर पडून यमगे (ता. कागल) येथील नामदेव दत्तात्रय मिसाळ (५०) यांचा मृत्यू ...

मुरगूड : डोंगर पठारावरून वैरण आणताना भारा मानेवर पडून यमगे (ता. कागल) येथील नामदेव दत्तात्रय मिसाळ (५०) यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. किरण पाटील यांनी याबाबत वर्दी दिली. दररोजच्या वाटेवर पावसामुळे निसरट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.

यमगे येथील नामदेव मिसाळ हे महादेव पाटील यांच्या बरोबर दररोज अंबाबाई मंदिराजवळ वैरण आणण्यासाठी जातात. शनिवारी सकाळी दोघे पठारावर गेले होते. नामदेव यांनी सुरुवातीला एक वैरणीचा भारा आणला. अंबाबाई मंदिराच्या आवारात ते गवत टाकून दुसरा भारा आणण्यासाठी पुन्हा ते पठारावर गेले. यावेळी खाली उतरताना त्यांच्या पुढे महादेव पाटील होते. दररोजच्या वाटेने येत असताना त्यांचा पाय निसटला आणि ते खाली पडले. यावेळी वैरणीचा भारा त्यांच्या अंगावर पडून त्यांच्या मानेला हिसका बसला. जखमी नामदेव यांना महादेव व इतर नातेवाइकांनी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात आणले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सांयकाळी त्यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नामदेव मिसाळ हे येथील शाहू दूध संस्थेत संचालक होते. होमगार्ड महेश मिसाळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

११ नामदेव मिसाळ डेड