शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट बियाणे शेतकर्‍यांच्या माथी

By admin | Updated: May 27, 2014 00:41 IST

कृषी विभागाचे दुर्लक्ष : हजारो रुपयांचा फटका

 आमजाई व्हरवडे : लाखो रुपयांचे बनावट बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारून खासगी दुकानदारांकडून शेतकर्‍यांची राजरोस लुटमार केली जात आहे. एवढी मोठी शेतकर्‍यांची लूट होत असताना राधानगरीतील दोन्ही कृषी विभागांचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेत असल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भात व गळिताची पिके घेतली जातात. खरीप हंगामात भातपिकाखाली मोठे क्षेत्र असते. शेतकर्‍यांच्या माथी बनावट भात बियाणे मारणारे रॅकेट गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. गतवर्षी तालुक्यात कर्नाटकातील एका कंपनीने वितरित केलेले भात पोसवण्यास तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. परिणामी शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा फटका बसला होता. याबाबत तक्रारी होऊनही राज्य शासनाचे कृषी खाते व पंचायत समितीच्या कृषी खात्याने केवळ पंचनामे करण्याचे काम तेवढे युद्धपातळीवर केले. त्यानंतर शेतकर्‍यांना त्यांची नुकसानभरपाई मात्र काहीच मिळाली नाही. यंदाच्या रब्बी हंगामात तर सूर्यफुलाला दाणेच धरलेले नाहीत. अनेक गावांत हा प्रकार घडूनही कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी कानावर हात ठेवले आहेत. मशागत, खते, पाणी व मजुरीचे पैसेही शेतकर्‍यांच्या अंगावर बसले आहेत. शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, एवढे घडूनही कोणत्याही खासगी दुकानदारावर कारवाई करण्याचे धाडस कृषी अधिकार्‍यांनी केलेले नाही. पंचायत समितीचा गुणनियंत्रण विभाग केवळ नावालाच आहे. शेतकर्‍यांची खुलेआम लूट होत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीने ‘ब्र’ शब्द काढलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना ‘वाली’ कोण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासन व पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. (वार्ताहर)