शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

वरवर शांतता; आतून तणाव, किरकोळ वाद

By admin | Updated: November 2, 2015 00:56 IST

प्रभागांतील परिस्थिती : शिवाजी पेठेत दोन इंगवले गट समोरासमोर

कोल्हापूर : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. शहराच्या बहुतांश प्रभागांत मतदानावेळी वरवर शांतता दिसत असली तरीही किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. रुईकर कॉलनी येथे भाजप समर्थकांनी मतदानाला येताना रॅली काढल्याने वादावादीचा प्रकार घडला. याशिवाय रंकाळा स्टॅँड प्रभागात रेगे तिकटी येथे पैसे वाटल्याच्या संशयाच्या वादातून दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र हायस्कूल मतदान केंद्रावर दोन इंगवले गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. याशिवाय मार्केट यार्डसह अनेक प्रभागांत मतदान केंद्रात जाण्यावरून पोलीस, उमेदवार आणि कार्यकर्त्यांत किरकोळ वादावादीचे वारंवार प्रकार घडत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीचा धाक दाखवून जमावाला पांगविल्याने पुढील अनर्थ टळले; पण प्रत्येक प्रभागात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील प्रत्येक प्रभागात किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. काही ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी दोन उमेदवारांच्या समर्थकांत खटके उडाले; तर काही ठिकाणी पैसे वाटल्याच्या संशयावरून वादाला तोंड फुटले. अनेक ठिकाणी मतदान केंद्रात जाण्यावरून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची पोलिसांशी वारंवार वादावादी होती होती. इंगवले समर्थकांवर सौम्य लाठीमार महाराष्ट्र हायस्कूल येथील मतदान केंद्राबाहेर दुपारी साडेचारच्या सुमारास नगरसेवक रवी इंगवले व त्यांचे प्रतिस्पर्धी अजय इंगवले हे दोघेजण आमने-सामने आले. यावेळी दोघांचेही शंभरपेक्षा जास्त कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगविले. (प्रतिनिधी) रेगे तिकटी चौकात वादावादी गंगावेश येथील रेगे तिकटी चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन गटांच्या समर्थकांत पैसे वाटल्याच्या संशयावरून शाब्दिक वादावादी झाली. यावेळी दोन्ही बाजूंचे शंभरभर कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेत लाठीचा धाक दाखवीत कार्यकर्त्यांना पांगविले. यावेळी कार्यकर्त्यांनी शंभर मीटरच्या आतमध्ये मोटारसायकल पार्किंग केल्या होत्या. त्यांतील हवा पोलिसांनी सोडली. ‘भाजप-ताराराणी’ समर्थकांच्या रॅलीने रुईकर कॉलनीत वादावादी कोल्हापूर : रुईकर कॉलनीतील हिंद को-आॅप. हौसिंग सोसायटीसमोर हिंद विद्यामंदिर येथे मतदान केंद्रावर दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार यांचे समर्थक डोक्यावर भाजपचे चिन्ह असलेल्या टोप्या आणि गळ्यात स्कार्फ घालून रॅलीने मतदान केंद्राकडे आले. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. या रॅलीमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार व त्यांच्या मतदान केंद्रातील प्रतिनिधींनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यासह या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रॅली काढलेल्या संबंधित समर्थकांना रोखले. भाजपचे चिन्ह असलेल्या टोप्या व स्कार्फ असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याने ते काढून मतदान करण्यासाठी केंद्रात जाण्यास पोलिसांनी त्यांना सांगितले. मात्र, समर्थक आपल्या मुद्द्यांवर ठाम राहिल्याने पोलीस व त्यांच्यात वादावादी झाली. अखेर पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच संबंधित समर्थकांपैकी काहींनी टोपी आणि स्कार्फ काढून मतदानाचा हक्क बजाविला. संबंधित समर्थकांच्या या रॅलीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. त्यांच्यात आणि भाजप-ताराराणीच्या समर्थकांत बाचाबाची झाली. याबाबत त्यांनी येथील मतदान केंद्राधिकारी यांच्याकडे आचारसंहिता भंग झाल्याबाबतची तोंडी तक्रार केली. या प्रकारामुळे या ठिकाणी काही काळ तणाव पसरला होता. या रॅलीमध्ये अधिकतर मतदान करून आलेल्या समर्थकांचा समावेश असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांनी सांगितले. राजर्षी शाहू मार्केट यार्ड प्रभागासाठी तंबाखू संघात मतदान केंद्र होते. या ठिकाणी मतदान करण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांत किरकोळ बाचाबाची झाली.