शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ मोजणी लॉकडाऊनमध्ये अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST

संदीप बावचे : शिरोळ : शिरोळ येथील हद्दवाढ आणि मिळकत मोजणीचा प्रश्न अंतिम टप्प्यात असताना लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे तो ...

संदीप बावचे :

शिरोळ : शिरोळ येथील हद्दवाढ आणि मिळकत मोजणीचा प्रश्न अंतिम टप्प्यात असताना लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे तो आता लांबणीवर पडला आहे. शासकीय कार्यालयात पंधरा टक्के उपस्थिती यामुळे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर मोजणीचा प्रश्न मार्गी लागू शकेल.

गेली वीस वर्षे प्रलंबित असलेल्या हद्दवाढ आणि मिळकत मोजणीकरिता जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर झाला होता. मोजणीसाठी १ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीला मार्च महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार, असे चित्र असतानाच कडक लॉकडाऊनमुळे हद्दवाढ मोजणीच्या प्रक्रियेला अडथळा आला आहे.

शहरातील वाढीव उपनगरांतील जवळपास ३५९१ मिळकतधारकांना दुहेरी कर भरावा लागत आहे. गावठाण हद्दवाढ मंजूर असतानाही संबंधीत प्लॉटधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळू शकत नाही. लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाने पाठपुरावा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून हद्दवाढीच्या मोजणीसाठी लागणारा निधी मंजूर झाला. त्यामुळे मोजणीच्या कार्यवाहीला पुणे जमाबंदी आयुक्त यांच्याकडून परवानगी नगरपालिकेने मागितली होती. मात्र, लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे ब्रेक लागला आहे. शिवाय, शासकीय कार्यालयाकडे पंधरा टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, असा नियम असल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे शिरोळकरांना हद्दवाढ मोजणीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

-----------------

कोट -

हद्दवाढ मोजणीच्या कार्यवाहीसाठी जमाबंदी आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मोजणीची प्रक्रिया होणार असल्यामुळे तीन ते चार महिन्यात संपूर्ण प्रक्रिया संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

- तैमुर मुल्लाणी, मुख्याधिकारी, शिरोळ