शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील नाटककार विज्ञाननिष्ठ असावा

By admin | Updated: November 6, 2014 00:02 IST

जब्बार पटेल : विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मान

सांगली : ‘रंगभूमीवरील नाटकांतून विविध विषय समाजासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयोगशील नाटककारांनी आधुनिकतेची कास तर धरली पाहिजेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विज्ञाननिष्ठ असावे,’ असे मत ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज (बुधवारी) येथे व्यक्त केले.रंगभूमी दिनानिमित्त येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने डॉ. पटेल यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्याहस्ते ‘विष्णुदास भावे पदक’ प्रदान करण्यात आले. भावे नाट्यमंदिरात झालेल्या समारंभात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर, आ. सुधीर गाडगीळ, समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे आदी उपस्थित होते. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, आतापर्यंत ज्यांना भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले, त्यांची नुसती नावे वाचली तरी मनावर दडपण येते. नाट्यसृष्टीतील अनेक दिग्गजांचा स्पर्श या पदकाला झालेला आहे आणि तो पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद होत आहे. रंगभूमीवर चारित्र्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्रत्येक नाट्यकलावंताने जपली पाहिजे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो, त्या विष्णुदास भावे यांचा जीवनपट अभ्यासला, तर त्यातून खूप काही शिकता येते. भावेंनी नाटकाची सीमारेषा केवळ मराठी या एकाच भाषेकरिता मर्यादित न ठेवता, हिंदी नाटकापर्यंत मजल मारली होती, हे दुर्लक्षून चालणार नाही.’ (प्रतिनिधी)हा तर सांस्कृतिक नेतृत्वाचा सन्मान : भडकमकर डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपट आणि नाटकांच्या पाठीमागे एक पक्की वैचारिक बैठक आहे. त्यांनी ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या नाट्यविषयक पर्यावरण बदलणाऱ्या संस्थेची स्थापना केली आणि रंगभूमी ही एक चळवळ असल्याचे सिध्द केले. स्पष्टच बोलायचे तर, डॉ. जब्बार हे आमच्या पिढीचे सांस्कृतिक नेते असून, आजचा होणारा सन्मान हा सांस्कृतिक नेतृत्वाचाच सन्मान असल्याचे मत चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले.विष्णुदास भावे गौरव पदक, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ११ हजार रुपये असे भावे गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.