शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

अपेक्षांचा डोंगर... आश्वासनांचे गाजर

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती

दत्ता पाटील - तासगाव -सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव तालुक्यातील आरवडे गावाची ११ नोव्हेंंबर २०१४ रोजी आदर्श ग्रामसाठी निवड केली. मात्र, सहा महिन्यांच्या कालखंडानंतर ढिम्म प्रशासन, अपेक्षांचा डोंगर आणि आश्वासनांचे गाजर दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया गावातील सामान्य जनतेतून उमटत आहे.वर्षभरात दोन वेळा खासदारांचा दौराआदर्श गाव म्हणून आरवडेची निवड झाली. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. निवड जाहीर करण्यासाठी स्वत: खासदार संजय पाटील अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. गावाची निवड झाल्यानंतर योजनेच्या निमित्ताने खासदारांनी केवळ दोनवेळा गावाला भेट दिली. दोन्ही दौऱ्यावेळी जिल्हा पातळीवरील अधिकारीही गावात आले. त्यांनी लोकांच्या समस्या, आणि अपेक्षा जाणून घेतल्या एवढेच.शंभर कोटींच्या अपेक्षांचे गाठोडे आदर्श गाव योजनेतून गावातील सर्व समस्या मार्गी लागणार, अशी आशा ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची होती. गावाच्या अपेक्षा वाढल्या. जिल्हा स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांकडून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले. कारभाऱ्यांचा उत्साह वाढला. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, शेतीच्या समस्या, शाळांची समस्या अशा एक ना अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गाव सरसावले. एक-एक करत गावाच्या विकासाचा शंभर कोटींचा आराखडा तयार झाला.डिसेंबर २०१४ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागाकडे मागण्यांच्या आराखड्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले. तेव्हापासून अद्याप गावाचे डोळे लागले आहेत, ते या आराखडा मंजुरीकडे. निधी मंजूर होईल आणि कामे मार्गी लागतील, असा विश्वास असणाऱ्या ग्रामस्थांनी आता वेगळे काहीतरी होईल, अशी अपेक्षाच करणे सोडून दिले आहे.केवळ एका योजनेला मंजुरीमात्र, वर्षभराच्या काळात केवळ एकाच योजनेला मंजुरी मिळाली. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी ५२ लाखांची पाणीपुरवठा योजनाच काय ती या आदर्श योजनेचे फलित ठरली!खासदार फंडाची अपेक्षा फोल गावाची निवड झाल्यानंतर सर्वच योजनांतून तात्काळ निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षा असलेल्या जिल्हा नियोजन समितीतून आतापर्यंत एकही रुपयाचा निधी मिळाला नाही. एवढेच नव्हे तर खासदारांनी स्वत: गावाची निवड केली, योजनाही खासदारांसाठी असल्यामुळे खासदार फंड मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गावाची ही अपेक्षाही फोल ठरली.ग्रामपंचायतीने गावच्या विकासाचा आराखडा तयार करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. आजपर्यंत शासकीय यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यापुढे सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. - गंगुताई मोरे, सरपंच, ग्रामपंचायत, आरवडेसंजय पाटील--आरवडे