शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांचे भवितव्य न्यायालयाच्या हाती

By admin | Updated: February 7, 2015 01:04 IST

जिल्हा बँक कर्जप्रकरण : सहकारमंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अस्वस्थता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या माजी संचालकांवर सहकारमंत्र्यांनी थेट कारवाईचा बडगाच उगारल्याने त्यांचे भवितव्य आता न्यायालयाच्या हातात उरले आहे. १४ फेबु्रवारीला संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची घोषणा केल्याने संचालकांचे धाबे दणाणले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी संचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यापाठोपाठ कॉँग्रेसच्या संचालकांनीही तयारी सुरू केली आहे. जिल्हा बॅँकेची विनातारण, अल्पतारण थकीत कर्जाची जबाबदारी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ४५ माजी संचालक व एका अधिकाऱ्यावर निश्चित केली आहे. विभागीय सह निंबधक राजेंद्र दराडे यांनी संबधित संचालकांना जबाबदारी निश्चित केलेली रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. तशा नोटिसा त्यांना लागू केल्याने संचालकांनी हातपाय हालवण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसच्या माजी संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने उच्च न्यायालयात अपील करत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल चुकीचा आहे त्यामुळे कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे; पण सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काही केले तरी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जबाबदारीची रक्कम संबधितांकडून वसूल केली जाणारच, असे सांगितल्याने माजी संचालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. १४ फेबु्रवारीला संचालकांच्या मालमत्तांवर टाच आणणार, अशी घोषणा केल्याने सरकार कारवाईबाबत ठाम असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कॉग्रेसच्या संचालकांनीही न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा परिस्थितीत संचालकांना केवळ न्यायालयच वाचवू शकते. सहकारमंत्र्यांकडे २५ फेबु्रवारीला सुनावणीकॉँग्रेसच्या माजी संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील दाखल केली होती. यावर २५ फेबु्रवारीला सुनावणी होणार आहे; पण याबाबत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून कॉँग्रेसचे संचालक सोमवारी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.