शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

कोल्हापुरातील प्रत्येक झाडांचा होणार ‘सात-बारा’

By admin | Updated: July 2, 2015 01:11 IST

२१ प्रभागांत अडीच लाख झाडे : जीपीएस प्रणालीव्दारे स्थळनिश्चिती; सर्वेक्षण पूर्ण होण्यास सहा महिने लागणार

कोल्हापूर : माणसाच्या जन्म-मृत्यू नोंदीप्रमाणेच शहरात असणाऱ्या सर्व झाडांच्या जीपीएस प्रणालीद्वारे ‘डाटा’ तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिका हद्दीतील २१ प्रभागांतील वृक्षगणना पूर्ण झाली असून, त्यामध्ये विविध प्रकारची अडीच लाख झाडे असल्याचे समोर आले आहे. शहरातील वृक्षसंपदा नेमकी किती व कशा प्रकारची आहे याची संपूर्ण माहिती संकलित होण्यास अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.शहरातील एकूण ४० प्रभागांनुसार टेर्राकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वृक्षसंपदेची संपूर्ण माहिती संकलित करण्याचा ठेका देण्यात आला आहे. १५ प्रभागांतील डाटा संकलित झाला आहे. सहा प्रभागांतील काम सुरू असून, त्यानंतर उर्वरित १४ प्रभागांतील काम हाती घेण्यात येणार आहे. अडीच लाखांपैकी ६४ झाडे धोकादायक असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.जीपीएस प्रणालीद्वारे झाडांची जागा रेखांश व अक्षांशानुसार निश्चित केली जाणार आहे. झाडांचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव, वय, ठिकाण (खासगी जागा, शासकीय, महापालिका, औद्योगिक की इतर) उंची, घेरा, प्रकार (औषधी, शोभीवंत, फळझाड), सद्य:स्थिती (रोगट, ताकदवान, कापलेले की धोकादायक) आदी प्रकारांत वर्गीकरण केले जाणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक आदित्य भार्नुके व प्रोजेक्ट मॅनेजर धनंजय राऊळ यांनी सांगितले. शहरातील झाडांची सद्य:स्थिती काय आहे ते या सर्वेक्षणात पुढे येईल. कोणत्या भागात वृक्षसंपदा कमी आहे त्याचा अभ्यास करून जाणीवपूर्वक झाडांची लागवड करणे सोपे होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नेमक्या झाडाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळेल. - प्रतिभा राजेघाटगे, उद्यान अधीक्षिक ा, महापालिकाआतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार शहरात सुबाभूळ, नदीकाठावर बच्चा, आंबा, निलगिरी, करंज, कडूलिंब, नारळ ही झाडे मोठ्या संख्येने असल्याचे पुढे आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानजीपीएस तंत्राच्या आधारे झाडाची संपूर्ण माहितीचे संकलन व एकत्रीकरण केले जाते. झाडाची संपूर्ण माहितीसह त्याची जागा निश्चित केली जाते. भविष्यात एखादे झाड तोडल्याची तक्रार आल्यास संकलित माहितीच्या आधारे शहानिशा करणे सोपे होणार आहे. प्रत्येक झाडाची इत्यंभूत माहिती असणार सात-बाराच यामुळे तयार होणार आहे. एका क्लिकवर शहरातील सर्व वृक्षसंपदेची माहिती मिळेल.