शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

चांगला दर देण्यासाठी इथेनॉल प्रकल्प

By admin | Updated: January 9, 2016 01:21 IST

हसन मुश्रीफ : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात इथेनॉल निर्यात प्रारंभ

सेनापती कापशी : कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच घोरपडे साखर कारखाना उभा करू शकलो. हा कारखाना उभा करताना टोकाची राजकीय ईर्षा झाली. या सगळ्यावर मात करीत महाराष्ट्रातील आदर्श साखर कारखाना उभा करण्यात यशस्वी झालो. फक्त ऊस गाळून शेतकऱ्यांना चांगला दर देता येणार नाही, म्हणूनच वर्षभर चालणारा इथेनॉल प्रकल्प उभा केला, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) कार्यस्थळावर कारखान्याने उत्पादित केलेल्या इथेनॉल निर्यात प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, वर्षभर इथेनॉल प्रकल्प चालणारा हा देशातील दुसरा किंवा तिसरा प्रकल्प आहे. भविष्यात इथेनॉल निर्मितीला मोठी किंमत येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणारा प्रकल्प उभा केला जाईल. कारखान्यात ३५ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जात.जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, वर्षभर घाम गाळून ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर देण्यासाठीच हा इंटिग्रेटेड प्रकल्प उभा केला आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता अशी मुश्रीफ यांची ओळख आहे. पंजाब नॅशनल बँकेचे वसिष्ट यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वागत केले. डिस्टिलरी विभागाचे प्रमुख संतोष मोरबाळे यांनी प्रास्ताविक, तर कार्यकारी संचालक महेश जोशी यांनी आभार मानले. दरम्यान, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल कॉर्पोरेशनला इथेनॉल पुरवठा करणाऱ्या टँकरचे पूजन केले. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, अबिद मुश्रीफ, सूर्याजी घोरपडे, ‘पंजाब नॅशनल’चे सौरभ कुमार, युनियन बँक आॅफ इंडियाचे शंभव चटोपाध्याय, जांगले, बँक आॅफ इंडियाचे बेहरा, बँक आॅफ महाराष्ट्राच्या बोरगावे, आदी उपस्थित होते. शेअर्स वाटप ३१ मार्चपर्यंतकारखान्याच्यावतीने ३१ मार्चपर्यंत शेअर्स वाटप करण्यात येणार असून, ३१ मार्चपूर्वी शेअर्स खरेदी केलेल्यांनाच एक फेब्रुवारीपासून साखर वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.