शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

पर्यावरणतज्ञांनी सुचवले कोल्हापुरातील महापूर नियंत्रणाचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन ...

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत वर्षभराच्या अंतरानेच आलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवणारे उपाय सुचविण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी पुढाकार घेतला आहे. सन १९८९, २००५, २०१९ , २०२१ या चार मोठ्या महापुरांतील नोंदी, निरीक्षणासह येथून पुढे कसा महापूर टाळणे शक्य आहे, याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंबंधी विस्तृत चर्चेची तयारीदेखील दर्शवली आहे. या अहवालात वडनेरे समितीचे समर्थन करताना एकात्मिक पूर नियंत्रण प्रणालीवर भर दिला असून, आपत्ती व्यवस्थापनाऐवजी आपत्ती नियंत्रणावर कसे लक्ष केंद्रीत करायला हवे, याबाबत काही सूचना केल्या आहेत.

पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, निसर्ग मित्रचे अनिल चौगुले, शिवाजी विद्यापीठातील माजी पर्यावरण विभागप्रमुख प्रा. डॉ. जय सामंत, निवृत्त सचिव दि. बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८९, २००५, २०१९ व २०२०मधील दोनवेळा उद्भवलेली पूर व २०२१मधील पूरपरिस्थितीबाबत प्रत्यक्ष निरीक्षणे, नोंदी, आकडेवारी, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान व हवामानात झालेले स्थानिक पातळीवर बदल या बाबींचा अभ्यास करून पंचगंगा नदी व कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी उपाय सुचवले आहेत. याबाबत मतभेद असू शकतात, मात्र वडनेरे समितीने सुचवलेल्या उपायांपेक्षा शक्य, व्यवहार्य, कायदेशीर, निरपेक्ष, वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुचवले आहेत. त्यांचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी पुढील पूर येण्याआधी व्हावी, अशी अपेक्षा मांडली आहे.

पूर रोखण्यासाठी उपाय

१) राधानगरी धरणाचे जुने यांत्रिक दरवाजे सेवाद्वार (स्वयंचलित सात वगळून) काढून त्याठिकाणी अत्याधुनिक तंत्र असलेले (ऑटोमाईझड गेट) त्वरित बसवून कार्यान्वित करावे.

२) जिल्ह्यातील सर्व धरणांच्या, साठवण तलावांच्या डूब क्षेत्रातील गाळाचे मोजमाप करा.

३) धामणी धरण त्वरित पूर्ण करावे. फ्री कॅचमेट नियोजित व संभाव्य लघु प्रकल्पाला प्राधान्य द्यावे.

४) पश्चिम घाटातील सर्व खाणकाम प्रकल्प बंद करा.

५) नदी, उपनदी, ओढा, नाला अशा किमान चार टप्प्यांवर रुंदी व गाळाचे मोजमाप करून खोली निश्चित करा.

६) पुराची सरासरी व महत्तम रेषा पूर्ण खोऱ्यात आखून शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील पूर क्षेत्रात होणारी भराव, बांधकामे रोखा.

७) राष्ट्रीय महामार्ग पूल शिरोली, रुई येथील पूल, इचलकरंजी पूल, बालिंगा, हळदी, राशिवडे, कळे येथे पाणी मार्गस्थ होणारे पूल बांधावेत.

८) रेडे डोहातून पाणी पुढे निचरा होण्यासाठी मोऱ्या बांधाव्यात.

९) कोल्हापूर शहरातील पेरूची बाग ते जयंती नाला (ब्रम्हपुरी टेकडीच्या दक्षिण बाजूने) असा अतिरिक्त पूर वाहून नेणारा जुना चॅनल अधिक रुंद करावा, तेथे पूल बांधून पाणी पुढे जाईल, अशी रचना करावी.

१०) संपूर्ण पाणलोट क्षेत्रात धूप नियंत्रण उपक्रम प्रभावीपणे राबवावा.

११) पाणलोट क्षेत्रात जमिनीचे रूप (उतार काढणे, सपाटीकरण) बदलणारी यांत्रिक कृती परवानगी व अटीला अधिन राहून असावी.

१२) कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्या व उपनद्या या दरम्यान नव्याने होणारे पूल, बंधारे व अनुषंगाने विकासकामांच्या परवानग्यांचे पुनरावलोकन करून श्वेतपत्रिका काढावी.

१३) अलमट्टी धरणासह धरणांतील पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त नियंत्रण समिती नेमली जावी.

कोल्हापूर शहराच्या अनुषंगाने पूर नियंत्रणासाठी मुद्दे...

१) कळंबा व रंकाळा या तलावातील गाळ काढणे, परिसरातील भराव व अनावश्यक बांधकाम काढण्यासह वर्षभरातील पाण्याचा वापर लक्षात घेऊन त्यामध्ये येणारे पाणी आणि विसर्ग याचे नियोजन करावे.

२) शहरातील सर्व नाले-ओढे यांची नोंद करून त्याचे प्रवाह, रुंदी - खोली याचा विकास आराखड्यात विचार व्हावा.

३) संपूर्ण शहरातील सांडपाणी निचरा करणाऱ्या वाहिन्यांचा अभ्यास करून वारंवार पाणी साचणे, तुंबणे असे प्रकार घडणारी ठिकाणे तपासावीत.

४) नाले, ओढे यावरील पूल आणि त्याचे पाणलोट क्षेत्र याचा अभ्यास करून उच्चतम पूरपरिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या मोऱ्या पुरेशा आहेत का? याचा अभ्यास करावा.