शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

पर्यावरणाच्या आड येणाऱ्या राक्षसांना गाडा

By admin | Updated: December 1, 2015 00:14 IST

आबासाहेब मोरे : संवर्धनासाठी पेढे येथे पश्चिम घाट जंगलपेर अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ

चिपळूण : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल सध्या बिघडू लागला आहे. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण करण्याची खरी गरज आहे. पूर्वी कंस, रावण असे काही मोजकेच राक्षस समाजात होते. त्यांचा नाश करणे त्या त्या वेळी सोयीचे ठरले. परंतु, आता पर्यावरणाच्या आड येणारे असंख्य राक्षस निर्माण झाले आहेत. या राक्षसांना सर्वसामान्य माणसांनी गाडून झाडे लावली पाहिजेत, ही सामुदायिक जबाबदारी आहे. त्याची सुरुवात आज परशुराम भूमीतून होत आहे याचा मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी केले. निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ महाराष्ट्र, कोकण एक्स्प्रेस फाऊंडेशन व पेढे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण रक्षणासाठी रविवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता आर. सी. काळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पश्चिम घाट जंगलपेर अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी आमदार रमेश कदम, सभापती स्नेहा मेस्त्री, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, पिपल्स हेल्पलाईनचे अ‍ॅड. कारभारी गवळी, पंचायत समिती सदस्य व संस्थेचे अध्यक्ष अभय सहस्त्रबुध्दे, अश्विनी भट, उल्का कुरणे, प्रमोद काकडे, सरपंच दीपक मोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष डी. एस. मोहिते, पोलीसपाटील वैष्णवी पानकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आर. सी. काळे विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यावेळी माजी आमदार कदम, सभापती मेस्त्री, उपविभागीय अधिकारी हजारे व मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रभातफेरीने सर्वजण मोरेवाडी येथील डोंगरात गेले. तेथे बिगर मोसमी बियांची पेरणी करुन जंगलपेर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सतीश कदम यांनी केले सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)हरित चळवळ : बिगर मोसमी पेरणी1पर्यावरण रक्षणासाठी पेढे येथे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभातफेरीतून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मोरेवाडी डोंगरावर बिगर मोसमी पेरणी करण्यात आली.2या कार्यक्रमाची सुरूवात उंबर वृक्ष पूजनाने करण्यात आली. यावेळी निसर्ग संशोधक माधव गाडगीळ यांना ‘ग्रीन मार्शल आॅफ वेस्टर्न घाट’ हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार उल्का कुर्ने, आश्विनी भट यांनी स्वीकारला.3‘गांधीजी अगेन्स्ट ग्लोबल वार्मिंग’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हरित चळवळीला बळकटी देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच अनुशंगाने हे अभियान पेढे येथे राबविण्यात आले.विद्यार्थ्यांना शपथपेढे येथे जंगलपेर अभियानाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. त्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी रॅली काढण्यात आली.