शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

वाढीव सभासदांची चौकशी सुरु

By admin | Updated: November 6, 2014 00:40 IST

न्यायालयाचा आदेश : भोगावती व बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खळबळ

राजाराम लोंढे - कोल्हापूर -परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यातील वाढीव सभासदांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने या प्रकरणाची येत्या दोन दिवसांपासून तपासणी सुरू केली जाणार आहे. प्रादेशिक साखर उपसंचालक डी. टी. भापकर यांच्या नेतृत्वाखाली टीम वाढीव सभासद दप्तराची तपासणी करणार आहे. त्याचबरोबर ‘बिद्री’च्या वाढीव सभासदांचीही चौकशी केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. भोगावती कारखान्याच्या सत्तारूढ राष्ट्रवादी कॉँग्रेस व ‘शेकाप’ गटाने आॅक्टोबर २०११ ते जून २०१२ अखेर चार टप्प्यांत तब्बल साडेतीन हजार वाढीव सभासद केले आहेत. याविरोधात विरोधी काँग्रेसच्या गटाने साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. अगोदरच्या सभासदांना नऊ महिने साखर मिळालेली नसताना वाढीव सभासदांना साखर कुठून देणार? असा सवाल विरोधी गटाने केला होता, तर सत्तारूढ गटाने विरोधी गट सत्तेवर असताना त्यांनीही अडीच हजार वाढीव सभासद केल्याची तक्रार केली होती. दोन्ही गटांनी परस्पर तक्रारी जुलै महिन्यात सहसंचालकांकडे केल्या आहेत. याबाबत कॉँग्रेसचे पी. डी. धुंदरे यांच्यासह काँग्रेसच्या मंडळींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन वाढीव सभासदांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत. बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वाढीव १७ हजार सभासदांचा वाद सुरू आहे. कारखान्याचे जुने ५३ हजार सभासद असताना संचालक मंडळाने २५ जूनच्या बैठकीत १७ हजार वाढीव सभासद केले. यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. साखर आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित वाढीव सभासदांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पात्र-अपात्रतेवरच भवितव्य या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यांत होत आहेत. वाढीव सभासदांवर निर्णय काय होतो, यावरच सत्तारूढ व विरोधकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. चौकशीला गती !‘बिद्री’च्या वाढीव सभासदांविरोधात दोन वर्षांपूर्वी सहसंचालक कार्यालयाकडे तक्रारी आल्या होत्या. पण राजकीय हस्तक्षेप व कारखान्याचे असहकार्य यामुळे तपासणी पूर्ण होऊ शकली नाही. राज्यात सत्तांतर झालेच, शिवाय या कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या राधानगरी-भुदरगडचे आमदार बदलल्याने चौकशीने आपोआपच गती घेतली. अशी होणार तपासणी-वाढीव सभासदांचा सभासद नंबर, गाव, ठराव क्रमांक, रहिवाशी दाखला, ‘८ अ’प्रमाणे क्षेत्र, गटनंबर, गटाचे क्षेत्र, पैकी बागायत, सभासद हिश्श्याचे क्षेत्रपैकी बागायत, पैकी उसाखालील, ऊस पुरवठा अशी तपासणी चौकशी अधिकारी करणार आहेत.