शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेडझोनमधील अतिक्रमण पूरस्थितीला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : नंदकुमार वडनेरे समितीने पूरस्थितीला रेड झोनमधील अतिक्रमण जबाबदार धरले असून ती वस्तुस्थिती आहे. ही सगळीच अतिक्रमणे आता ...

कोल्हापूर : नंदकुमार वडनेरे समितीने पूरस्थितीला रेड झोनमधील अतिक्रमण जबाबदार धरले असून ती वस्तुस्थिती आहे. ही सगळीच अतिक्रमणे आता काढणेही शक्य नाही. ज्याठिकाणी नदी, नाले व ओेढ्याच्या पात्रांमध्येच गंभीर अतिक्रमण झाले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मर्यादेपेक्षा जास्त पाऊस होऊन पूरस्थितीची शक्यता दिसून आली की येथील धरणातील पाण्याचा विसर्ग व त्याच प्रमाणात अलमट्टीतील विसर्ग सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-सांगली येथील संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते काेल्हापुरात आले होते, या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. वडनेरे समितीने पूरस्थितीला रेडझोनमधील बांधकामांना जबाबदार धरले आहे, या अतिक्रमणांवर कारवाई करणार का, या प्रश्नावर मंत्री पाटील म्हणाले की, अतिक्रमणांमुळे पुराचा धोका जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामु‌ळे नैसर्गिक नाले, ओढे, नद्यांमधील पाणी वाहून नेण्यात अडथळा येऊन पाणी तुंबून राहते. शिवाय कॉंक्रिटीकरण, डांबरीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. फुगवट्यामुळे पंचगंगा, कृष्णा आणि वारणेचे पाणी लवकर खाली जात नाही. यापूर्वी झालेल्या अतिक्रमण काढायचे म्हटल्यास नवा वाद निर्माण होतो. त्यामुळे यापुढे अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जाईल, त्यामुळे पूरावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. मात्र नैसर्गिक प्रवाहात मोठा अडथळा निर्माण करणारे गंभीर अतिक्रमण झाले असेल तर ते नागरिकांनी निदर्शनास आणून द्यावे त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

मंत्री जयंत पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी कर्नाटक सरकारने अलमट्टीतील विसर्ग वाढवून चांगले सहकार्य केले आहे, त्यामुळे पुराचा धोका टळला. यंदादेखील मुख्य सचिव स्तरावर चर्चा झाली असून मंत्रीस्तरावरदेखील पुढील काही दिवसांत चर्चा होणार आहे. पुराचा धोका निर्माण होण्याआधीच कोल्हापूरमधील धरणांतील पाण्याचा विसर्ग व त्याच प्रमाणात अलमट्टीतून विसर्ग होईल याचे नियोजन केले जात आहे. कर्नाटक सरकारकडून देखील बॅकवॉटरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कर्नाटकसोबत दहा दिवसांत चर्चा

कर्नाटककडून अलमट्टीची उंची वाढवण्याचा विचार केला जात आहे याबाबत ते म्हणाले की, अलमट्टीबाबत कर्नाटकशी आमचा संवाद चांगला आहे, आमची याबद्दलची मते त्यांनी मान्य केली असून एकमेकांना सहाय्य करण्याचीच भावना आहे. पुढील १० दिवसांत मंत्रीस्तरावर आम्ही चर्चा करू.

पूरस्थितीचा आराखडा व कोरोनाची स्थिती

पाण्याची पातळी अधिकाधिक किती वाढू शकेल, कोणत्या गावांमध्ये, शहरांमध्ये किती पाणी शिरेल, किती कुटुंबं बाधित होतील याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवसांत त्याचा नकाशा करून संबंधित ग्रामपंचायती व तालु्क्यांना ते देण्यात येणार आहे. त्यानुसार जलसपंदा विभाग व महसूलकडून उपाययोजना केल्या जातील. नागरिकांचे स्थलांतर आणि त्या काळातील कोरोनाची स्थिती याचा विचार करून पालकमंत्री व जिल्हाधिकारी नियोजन करतील.

---